होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

जळगावमध्ये नागरिक उकाड्याने बेजार!, जिल्ह्याचे तापमान किती ‘ते’ जाणून घ्या!

On: May 25, 2026 7:02 PM
Follow Us:
---Advertisement---

atest Weather News: वातावरणातील उकाडा काही कमी होण्याचे नाव घेत नाही, तापमान घसरले तरी उष्ण झळांनी जीव कासावीस होत आहे, तसे ही आज जळगावचे तापमान पुन्हा कमी झाले असून ते ४१.५ अंश सेल्सियस इतके घसरले आहे. रविवारी ४३.६ अंश सेल्सियस इतके तापमान होते. आता तापमान उतरले असले तरी हवामानात उष्णता कायम आहे. दिवसभर वातावरणात उकाडा जाणवत असल्याने सायंकाळपर्यंत उष्म झळा सोसाव्या लागतात. याच दरम्यान हवामान खात्याने कोकण आणी मध्य महाराष्ट्रात २५ ते २८ असा चार दिवसांचा येलो अलर्ट दिला आहे. तर विदर्भात २५ ते २९ असा पाच दिवसांचा येलो अलर्ट दिला आहे.

राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे ४७.२ अंश सेल्सियस नोंदवले गेले आहे. तर सर्वात कमी किमान तापमान २५.२ इतके महाबळेश्वरमध्ये नोंदवले गेले आहे. कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला असून विदर्भात व मराठवाड्यात हवामान कोरडे होते. विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी व कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सियसमध्ये)

मुंबई (कुलाबा) ३५.४,
सांताक्रूझ ३४.८,
रत्नागिरी ३२.६,
डहाणू ३६.८,
पुणे ३४.९,
लोहगाव ३५.६,
जळगाव ४१.५,
कोल्हापूर ३२.०,
महाबळेश्वर २५.२,
मालेगाव ४०.२,
नालशक ३६.०,
सांगली ३५.०,
सातारा ३४.५,
सोलापूर ३९.८,
धाराशिव ४०.७,
छत्रपती संभाजीनगर ४०.८,
परभणी ४०.१,
अकोला ४३.४,
अमरावती ४५.२,
बुलढाणा ४०.६,
ब्रह्मपुरी ४७.२,
चंद्रपूर ४५.६,
गोंदिया ४५.०,
नागपूर ४५.४,
वाशीम ४३.४,
वधाज ४५.५,
यवतमाळ ४२.८.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment