Letest Weather News: जिल्ह्याचा पारा हळू हळू वाढत आहे, गेले दोन दिवस पारा ४३ अंशावर होता, आता तापमान कोरडे ठाक असल्याने वातावरणात उष्णता वाढले आहे. त्यामुळे जळगावचे कमाल तापमान आज ४४ अंशावर गेले आहे. पारा वाढल्याने दिवसभर उष्णतेच्या झळा लागत आहे, राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला येथे ४५.२ अंश सेल्सियस नोंदवले गेले आहे. वातावरणात इतका उष्मा जाणवत आहे की, उन्हाने जीवाची काहिली होत आहे. वातावरणातील उष्म्यापासून बचाव करायचा असले तर दुपारी उन्हात फिरू नये अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन आणि अग्नीशमन दलाने जारी केल्या आहे. राज्य शासन देखील यावर लक्ष ठेऊन आहे. त्यामुळे जळगावकर स्वतःला उन्हापासून जपा आणि गरज नसेल तर उन्हात फिरू नका असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे.
गेल्या २४ तासांतील पर्जन्यमान असे आहे, विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे होते.
कोकण-गोव्यात येथे तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे.
गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सियसमध्ये)
मुंबई (कुलाबा) ३३.६,
सांताक्रूझ ३३.६,
अचलबाग ३६.७,
रत्नागिरी ३३.४,
पणजी (गोवा) ३५.०,
डहाणू ३५.६,
पुणे ३९.७,
लोहगाव ४२.३,
अहिल्यानगर ४१.८,
जळगाव ४४.०,
कोल्हापूर ३७.५,
महाबळेश्वर ३२.७,
मालेगाव ४३.६,
नाशिक ३८.७,
सांगली ४०.५,
सातारा ४१.३,
सोलापूर ४३.६,
धाराशिव ४२.२,
छत्रपती संभाजीनगर ४२.८,
परभणी ४३.५,
नांदेड -, ४२.४,
अकोला ४५.२,
अमरावती ४५.२,
बुलढाणा ४२.३,
ब्रह्मपुरी ४३.४,
चंद्रपूर ४४.८,
गोंदिया ४२.२,
नागपूर ४४.४,
वाशिम ४३.६,
वधाज ४५.०,
यवतमाळ ४४.०.






