Chalisgaon News: तरुणीला प्रेमच्या जाळ्यात ओढून एका तरुणीने तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल काढले आणि ते मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून तब्बल ८ लाख रुपये उकळणाऱ्या चाळीसगाव येथील तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. नाशिक पुण्यानंतर चाळीसगाव येथे महिला अत्याचाराची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या मोबाईलची तपासणी केले असता, खळबळजनक माहिती समोर आल्याने पोलिसांना ही धक्का बसला.
मिळलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथील ही घटना आहे, प्रेम प्रकरणाच्या जाळ्यात ओढून एका तरुणीला फसवून तिचे आक्षेपार्य फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणारा चाळीसगाव येथील यश महेंद्र जैन या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे आरोपी यश जैन याने एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर त्याने त्याचे काही वैयक्तिक आणि आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती सातत्याने दाखवून त्याने पीडित तरुणीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

बदनामीच्या भीतीने पीडित तरुणीने त्याला वेळोवेळी तब्बल आठ लाख रुपये दिल्याचे चौकशीत समोर आले. त्यानंतरही या नाराधमाचा त्रास काही थांबला नाही, अखेर आरोपीचा त्रास असह्य झाल्याने धीर धरून तरुणाने धाडस करत त्याच्या विरोधात पोलिसात धाव घेतली. आणि आरोपीला अद्दल घडवली. तरुणीच्या धाडसामुळे या नराधमाला पोलिसांनी अटक केली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला. दरम्यान राज्यभर महिला अत्याचाराच्या घटना गाजत असतांना जळगाव जिल्ह्यातील या घटनेने खळबळ उडाली आहे. आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा पीडितेच्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी व्यक्त केली आहे.






