Letest Weather News: राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर जिल्ह्यात आहे, चंद्रपूरचे तापमान आज ४५ अंश सेल्सियस इतका तापमानाचा पारा गाठला आहे, त्यामुळे वातावरणात सकाळपासूनच उकाडा जाणवत आहे. सलग काही दिवस रेकॉर्डब्रेक तापमान असलेल्या अकोल्याचे तापमान किंचित घसरले असून आज ४४.४ अंश होते, तसे असले तरी वातावरणात उष्मा जाणवत आहे. जळगावचे तापमान ४३.८ अंश सेल्सियस आहे.तापमानात किंचित घसरण दिसत असली तरी दिवसभर उन्हाचा तडाखा बसतो. रस्ते सुमसाम दिसून येतात. सर्वात कमी तापमान नेहमीप्रमाणे महाबळेश्वर येथिल ३३ अंश सेल्सियस इतके आहे.
२४ तासांतील पर्जन्यमान असे असून विदर्भात तुरळक ठिकणी उष्णतेची लाट होती. संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे होते. कोकण- गोव्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ, विदर्भात बऱ्याच दठकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.
गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सियसमध्ये)
मुंबई (कुलाबा) ३४.२,
सांताक्रूझ ३५.१,
अचलबाग ३६.२, रत्नागिरी ३४.१,
पणजी (गोवा) ३५.४,
डहाणू ३६.४,
पुणे ३९.८,
लोहगाव -,
अहिल्यानगर ४१.९,
जळगाव ४३.८,
कोल्हापूर ३६.८,
महाबळेश्वर ३३.०,
मालेगाव ४३.२,
नाशिक ३८.२,
सांगली ३८.८,
सातारा ३९.५,
सोलापूर ४२.२,
धाराशिव ४२.२,
छत्रपती संभाजीनगर ४२.८,
परभणी ४३.५,
नांदेड -, ४२.४,
अकोला ४४.२,
अमरावती -,
बुलढाणा ४१.३,
ब्रह्मपुरी ४३.८, चंद्रपूर ४५.०,
गोंदिया ४३.०,
नागपूर ४४.२,
वाशिम ४३.४,
वर्धा ४४.२,
यवतमाळ ४३.२.






