होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

आरोग्य सेवकाने केली आत्महत्या; का उचलले अखेर एवढे टोकाचे पाऊल!

On: May 10, 2026 5:48 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: पत्नीच्या छळाला कंटाळून आरोग्य सेवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेने खळबळ उडाली होती याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. संबंधित युवकाचा सासरच्या मंडळींशी कायम वाद होत असे. तसेच पत्नीकडून मानसिक छळ केल्याचे समोर आले, त्यातच स्वत:च्या मुलालाही भेटण्यावर पाबंदी असल्याने एका ३६ वर्षाच्या युवकाने आत्महत्या केल्याची घटना पंचवटीत घडली होती. प्रारंभी ही आकस्मिक घटना वाटत होती, मात्र तपासानंतर पत्नीच्या छळाला कंटाळून या युवकाने जीवनयात्रा संपवल्याचे उघड झाले.

मिळालेली माहिती अशी की, या युवकाचा हा दुसरा विवाह होता. विवाहानंतर काही दिवस आनंदात गेले, त्यांना एक अपत्यही झाले. परंतु, काही दिवसांनी दोघांमध्ये किरकोळ कारणांवरुन वाद वाढू लागले. त्याची पत्नी मुलासह वेगळी राहू लागली होती. युवकाचे आपल्या मुलावर खूप प्रेम होते. मुलाला भेटावे अशी त्याची इच्छा होती. मात्र पत्नी त्याला मुलाला भेटू देत नसल्याने युवक निराश होता. त्यातच त्याची पत्नी भावाच्या लग्नासाठी आणि स्वतःच्या खर्चासाठी त्याच्याकडे सातत्याने पैशांचा तगादा लावत होती. सासरची मंडळी ही या युवकाला मानसिक त्रास देत होती.

पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून दि.१७ एप्रिल रोजी संबंधित युवकाने वडजाईमाता नगर येथील घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. आपल्या पोटच्या मुलालाही भेटता येत नसल्याने तो नोराश झाला होता. हीच मानसिकता त्याला आत्महत्येपर्यंत प्रवृत्त करण्यास कारणीभूत ठरल्याचे उघड झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, जून २०२४ ते एप्रिल २०२६ या कालावधीत हा सर्व प्रकार घडला. प्रारंभी या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यूची नोंद कारण्यात आली होती.

दरम्यान युवकाच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या सामानाची तपासणी केली असता, त्यात धक्कादायक बाब समोर आली. त्यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठले. आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित युवकाने पत्नीकडून मिळणाऱ्या धमक्या, छळ आणि मानसिक छळाचे व्हिडिओ आणि ‘कॉल’ रेकाॅर्डिंग करून ठेवले होते. हे सर्व पुरावे युवकाच्या वडिलांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. पंचवटी पोलिसांनी युवकाची पत्नी, त्याची सासू आणि सासरे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पंचवटी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment