होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Milk Rate Hike: जळगावात ‘विकास’चे दूध आजपासून प्रतिलिटर 2 रुपयांनी  महागले!

On: May 17, 2026 6:51 PM
Follow Us:
---Advertisement---
Milk Rate Hike: इंधनाच्या सातत्याने वाढणार्‍या किंमतींमुळे वाहतूक खर्चातील वाढ तसेच पशुखाद्य, वीज आणि प्रक्रिया खर्च वाढल्यामुळे जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने विकास दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दर रविवारपासून लागू करण्यात आले आहेत. यानिर्णयामुळे शहर व परिसरातील हजारो ग्राहकांच्या दैनंदिन खर्चात वाढ होणार आहे. दूध दरवाढीमुळे घरगुती ग्राहकांसोबतच चहा विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, मिठाई विक्रेते आणि दुग्धजन्य पदार्थ तयार करणार्‍या व्यावसायिकांवरही परिणाम होणार आहे.
दूध संघाकडून जिल्ह्यातील विविध गावांमधून दररोज मोठ्याप्रमाणावर दूध संकलित केले जाते. हे दूध प्रक्रिया करून शहरातील विक्री केंद्रांमार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाते. शहरात दररोज सुमारे 45 हजार लिटर दुधाची विक्री होत असून त्यामध्ये गोल्ड दूध आणि म्हशीच्या दुधाला अधिक मागणी असते. सकाळी आणि सायंकाळी मोठ्याप्रमाणात दूध विक्री होत असल्याने वाहतूक व्यवस्था आणि शीतसाखळी व्यवस्थापनासाठी मोठा खर्च करावा लागत असल्याचे संघाच्या सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात दूध दरात तिसर्‍यांदा वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी गोल्ड दूध 70 रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दरवाढ करण्यात आली.
नवीन दरानुसार विकासचे गोल्ड दूध 74 रुपयांवरून 76 रुपये प्रतिलिटर करण्यात आले आहे. म्हशीच्या दुधाचा दर 62 रुपयांवरून 64 रुपये प्रतिलिटर झाला आहे. तर गायीचे दूध 56 रुपयांवरून 58 रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध होणार आहे. दूध संघाकडून दरवाढीबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांत डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतीत सातत्याने वाढ झाल्याने ग्रामीण भागातून शहरात दूध पोहोचविण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
त्याचबरोबर दूध संकलन केंद्रांवरील देखभाल खर्च, शीतगृह व्यवस्था, पॅकेजिंग साहित्य, प्लास्टिक पिशव्यांचे दर आणि वीज बिलांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च आणि विक्री खर्च यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली होती.
म्हशीच्या दुधाच्या दरातही सातत्याने वाढ झाली असून ग्रामीण भागातील उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी देखील अधिक दराची मागणी करत होते. पशुखाद्याचे वाढलेले दर, चार्‍याची कमतरता आणि जनावरांच्या देखभालीवरील खर्चामुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांवर आर्थिक ताण निर्माण झाला होता. त्यामुळे दूध खरेदी दर वाढविण्याची मागणी दूध उत्पादकांकडून सातत्याने केली जात होती. विक्री दरातील वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मासिक खर्चात वाढ होणार आहे.
चार सदस्यांच्या कुटुंबामध्ये दररोज एक ते दोन लिटर दूध सहजपणे वापरले जात असल्याने महिन्याला अतिरिक्त खर्च वाढणार आहे. चहा विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनीही या निर्णयामुळे चहा, कॉफी आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment