America Israel- Iran War: अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये नौदलाच्या तीन जहाजांवरील हल्ले हाणून पाडल्याने आणि इराणी लष्करी तळांवर प्रत्युत्तरा दाखल कारवाई केल्याने पुन्हा तणाव वाढला आहे. संयुक्त अरब अमिरातीने क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर दिल्याने, इराण युद्धातील अडचणी आणि अडथळ्याने शस्त्रसंधीवर शुक्रवारी आणखी परिणाम होत आहे. दरम्यान संयुक्त अरब अमिरातमध्ये नुकसानीचे कोणतेही वृत्त नाही, असे असोशिएटेड प्रेसने बातमी म्हटले आहे.
इराण आणि अमेरिका यांच्यातील वाटाघाटी करणारे प्रतिनिधी युद्ध संपवण्यासाठी करार करण्याचा प्रयत्न करत असताना, दोन्ही पक्ष एकमेकांवर हल्ले करत आहेत, परंतु आतापर्यंत त्यांनी मोठ्या युद्धाकडे परत जाणे टाळले आहे. इराणचा अणुकार्यक्रम, जो अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू करताना थांबवण्याची शपथ घेतली होती, होर्मुझची सामुद्रधुनी, जो एक महत्त्वाचा जलमार्ग असून इराणने जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव आणण्याच्या प्रयत्नात जवळजवळ बंद केला आहे, यांसारख्या मुद्द्यांवर दोन्ही पक्ष करार करण्याच्या किती जवळ आहेत, हे स्पष्ट नाही.
गुरुवारी तेहरानने सांगितले की, मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या पाकिस्तानमार्फत अमेरिकेने युद्ध संपवण्यासाठी दिलेल्या नवीनतम प्रस्तावांची ते तपासणी करत आहे. मात्र एकमेकांवरील हल्ले हे वाटाघाटींमध्ये अडथळे निर्माण करत आहे. होर्मूझ सामुद्रधुनी संपूर्ण खुली करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न सुरू आहे. तर होर्मूझवर इराण पूर्ण नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूच्या नौदलामध्ये छोट्या छोट्या चकमकी होत आहेत, मात्र अमेरिकेच्या नौदलाच्या तीन जहाजांवर इराणने हल्ला केला आहे, त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रूम्प यांनी संताप व्यक्त केला आहे.






