होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

जामनेर येथे पाच वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू!

On: May 4, 2026 6:47 PM
Follow Us:
---Advertisement---

Jamner News: जामनेर येथे स्विमिंग पूलच्या चेंबरमध्ये बुडून पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. निष्काळजीपणा आणि सुरक्षिततेच्या अभावाने घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. उत्कर्ष गणेश पाटील असे मृत बालकाचे नाव आहे. उत्कर्ष हा त्याचे वडील गणेश पाटील यांच्यासोबत पहिल्यांदाच पोहण्यासाठी जामनेर नगर परिषदेच्या स्विमिंग पूलवर गेला होता. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने पूल परिसरात गर्दी होती. पोहण्याचा आनंद घेतल्यानंतर वडिलांनी उत्कर्षला पूलाच्या काठावर उभे केले. आणि त्याचे विविध पोजमध्ये छायाचित्र काढले. मात्र, तो आनंद काही काळच ठरला, त्यानंतर ते क्षण लगेच दुःखद आठवणीत बदलले. छायाचित्र काढून झाल्यानंतर गणेश पाटील कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूममध्ये गेले. यावेळी उत्कर्ष काही काळ एकटाच स्विमिंग पूलाजवळ उभा होता. परत आल्यावर उत्कर्ष दिसला नसल्याने ते बिथरले.

मिळालेल्या माहितीनुसार, खेळता खेळता तो पूलाच्या आउटलेटसाठी तयार करण्यात आलेल्या खोल चेंबरजवळ गेला. या चेंबरवर योग्य झाकण किंवा सुरक्षा उपाय नसल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यात तो पडून बुडाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, कपडे बदलून बाहेर आल्यानंतर गणेश पाटील यांना उत्कर्ष जागेवर दिसला नाही. त्यांनी तत्काळ परिसरात शोध सुरू केला. उपस्थित नागरिकांनीही त्याचा शोध घेतला, मात्र तो कुठे सापडला नाही. काही वेळानंतर उत्कर्ष हा चेंबरमध्ये आढळून आला. त्याला तातडीने बाहेर काढून उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र, तोपर्यंत त्याची प्राण ज्योत मालवली होती.

या घटनेनंतर पूल परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पालक आणि नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. वर्षभरात अशा प्रकारची दुसरी घटना असल्याने स्विमिंग पूल व्यवस्थापनाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून नागिरकांनी संताप व्यक्त केला आहे. लहान मुलांसाठी येथे सुरक्षा संबंधीत उपाय योजना नसल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक नागरिकांनी पूल परिसरात अधिक कडक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली असून, अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment