UAE Dubai: ‘युएई’च्या अधिकाऱ्यांनी म्हटले की,“कोणत्याही कारण नसतांना केलेला हा दहशतवादी हल्ला” या घटनेचे असे वर्णन केले, रविवारी संयुक्त अरब अमिरातच्या एकमेव अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिसरात ड्रोन हल्ल्यामुळे आग लागली. यासाठी कोणालाही जबाबदार धरण्यात आले नाही, परंतु अमेरिका आणि इराणने पुन्हा तणाव वाढल्याने नव्याने युद्ध सुरू होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे वृत्त असोशिएटेड प्रेसने दिलेले आहे.
या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा किरणोत्सर्गी गळती झाल्याचे वृत्त नाही.मात्र इस्रायलचे हवाई संरक्षण दल आणि कर्मचारी यांना आश्रय देणाऱ्या संयुक्त अरब अमिरातीने अलीकडेच इराणवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेच्या नौदलाने नाकेबंदी केल्याने इराणच्या ताब्यातील हा मार्ग ऊर्जेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असून होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून तणाव वाढला आहे.

“इराणसाठी वेळ संपत आहे, आणि त्यांनी लवकरात लवकर हालचाल केली पाहिजे, नाहीतर त्यांचे काहीही शिल्लक राहणार नाही,” असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवर बोलल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर पोस्ट केले. नेतान्याहू यांनी अमेरिकेसोबत मिळून इराणवर २८ फेब्रुवारी रोजी हल्ला केला होता आता या युद्धाला तीन महिन्याने होतील. तसेच ट्रम्प यांनी तेहरानसाठी वारंवार मुदत निश्चित केली आणि नंतर माघार घेतली, असे दिसले
दरम्यान “आमचे सशस्त्र दल तयार आहे, आणि त्याच वेळी राजनैतिक चर्चाही सुरू आहे,” असे इराणच्या सर्वोच्च नेत्याचे लष्करी सल्लागार मोहसेन रझाई यांनी सरकारी दूरदर्शनवर सांगितले. दरम्यान शांततेसाठीचे राजनैतिक प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे युद्धविराम अजूनही नाजूक स्थितीत आहे. आणि लेबनॉनमध्ये नाममात्र युद्धविराम असूनही, इस्रायल आणि इराण-समर्थित हिजबुल्ला या दहशतवादी गटात लढाई तीव्र झाली आहे.









