होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

जळगावच्या रस्त्यांसाठी आमदरांचे मुख्यमंत्र्यांना साकडे; 200 कोटी निधीची मागणी

On: April 28, 2026 3:14 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: शहराच्या विकासाला गती देण्यासह दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आ. सुरेश भोळे यांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर भाजप आमदार सुरेश भोळे यांच्याकडून निवेदने सादर करण्यात आली. दोघांच्या या भेटीकडे प्रशासन आणि स्थानिक पातळीवरील विकास प्रक्रियेला गती देणारा टप्पा म्हणून पाहिले जात आहे.

मुख्यमंत्री फडणवीस हे धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे विविध कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी जळगाव विमानतळावर आले होते. यावेळी त्यांच्यासमोर आमदार सुरेश भोळे यांच्याकडून सर्वप्रथम जळगाव महानगरपालिकेतील भूसंपादन प्रकरणांचा मुद्दा अत्यंत गांभीर्याने मांडण्यात आला.

शहरातील विविध भागांमध्ये झालेल्या भूसंपादन प्रक्रियेत काही ठिकाणी प्रशासकीय त्रुटी, विसंगत मूल्यांकन आणि नियमबाह्य निर्णय घेतल्यामुळे शासनावर कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. विशेषतः मौजे जळगाव आणि मेहरूण परिसरातील काही प्रकरणे संशयास्पद असल्याचे निदर्शनास आणून देत, या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती किंवा विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याची मागणी करण्यात आली.

या संदर्भात सादर केलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले की, सार्वजनिक निधीचा अपव्यय रोखणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. चुकीच्या पद्धतीने वाढवून दाखवलेल्या मोबदल्यामुळे शासनाच्या तिजोरीवर मोठा ताण येत असून, यावर तातडीने नियंत्रण आवश्यक आहे. मात्र, याचवेळी जमीनमालकांवर अन्याय होऊ नये याचीही काळजी घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले. योग्य, पारदर्शक आणि न्याय्य निकषांवर आधारित मोबदला देणे आवश्यक असून, चौकशीअंती पात्र ठरणाऱ्या प्रकरणांमध्ये शासनाने आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जळगाव शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि वाढत्या वाहतुकीचा ताण. शहराचा झपाट्याने होणारा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता विद्यमान रस्ते अपुरे पडत आहेत. त्यामुळे नागरिकांना दररोज वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्यांचे दुरुस्तीकरण, मजबुतीकरण आणि काँक्रीटीकरण करण्यासाठी एकूण 200 कोटी रुपयांच्या विशेष निधीची मागणी करण्यात आली.

योग्य दर्जाचे रस्ते निर्माण झाल्यास केवळ वाहतूक सुरळीत होणार नाही, तर शहराच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या दोन्ही विषयांवर देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली. जळगावच्या विकासासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. संबंधित विषयांचा गांभीर्याने विचार करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर उपस्थित होत्या.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment