होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

जळगावचा पारा घसरला, मात्र उकाड्याने नागरिक हैराण..

On: May 22, 2026 7:24 PM
Follow Us:
---Advertisement---

Latest Weather News: विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता जाणवत आहे, जळगावचे तापमान गेल्या दोन दिवसांपासून ४२ अंशाच्या वर किंवा आसपास बघायला मिळत आहे. कमाल तापमान घसरले असले तरी वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत आहे, उष्ण झळांनी नागरिक त्रस्त झाले आहे, आज दिवसभर अधूनमधून ढगाळ हवामान होते, पण उष्णतेची तीव्रता देखील कायम होती, त्यामुळे दुपारी उन्हाचे चटके बसत नसले तरी वातावरणात ऊष्मा कायम होता. तरी आज जळगावचे तापमान हे ४२ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. त्यामुळे ढगाळ हवामानाने काहीसा दिलासा दिला, तरी उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे.

राज्यात सार्वधिक कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे ४७.१ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले, तर सर्वात कमी कामाला तापमान २९.६ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. कोकण-गोवा व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे, तर विदर्भात व मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे होते. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ; तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी व कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ दिसत आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे,

गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सियसमध्ये)

मुंबई (कुलाबा) ३४.६,
सांताक्रूझ ३४.७,
अलिबाग ३५.२,
रत्नागिरी ३४.२,
पणजी (गोवा) ३४.४,
डहाणू ३५.८,
पुणे ३८.२,
लोहगाव ४०.०,
अहिल्यानगर ३९.८,
जळगाव ४२.०,
कोल्हापूर ३५.७,
महाबळेश्वर २९.६,
मालेगाव ४१.२,
नाशिक ३६.४,
सांगली ३८.५,
सातारा ३८.९,
सोलापूर ४०.९,
धाराशिव ४०.६,
छत्रपती संभाजीनगर ४१.८,
परभणी ४४.०,
अकोला ४४.९,
अमरावती ४५.८,
बुलढाणा ४१.०,
ब्रह्मपुरी ४७.१,
चंद्रपूर ४६.८,
गोंदिया ४५.२,
नागपूर ४६.६,
वाशीम ४२.६,
वर्धा ४६.४,
यवतमाळ ४५.०.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment