होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

राज्य महिला आयोग अध्यक्षपद ‘या’ व्यक्तींना द्यावे? रोहित पवार यांची मागणी

On: May 3, 2026 4:14 PM
Follow Us:
---Advertisement---

Pune News: भोर तालुक्यातील नसरापूर येथे ४ वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानवीय अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचा राज्यभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. १ मे, महाराष्ट्र दिनी एका ६५ वर्षीय आरोपीने या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता आरोपीला ७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशा घटना रोखण्यासाठी आणि तात्काळ कठोर कारवाई करण्यासाठी आ. रोहित पवार यांनी महिला आयोगाचे अध्यक्षपद कर्तव्यदक्ष महिला आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्यासह इतर सामाजिक कार्यकर्त्या, महिला अधिकाऱ्यांना देण्याची मागणी केले आहे.

या घटनेने महाराष्ट्रभर संतापाची लाट आहे. या प्रकरणाची बाल आयोगाने ही दाखल घेतली आहे. या अमानवीय घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. आरोपीला कठोर शिक्षा मिळावी या मागण्यांसाठी शनिवारी रात्री नसरापूरच्या ग्रामस्थांनी पीडित चिमुकलीचा मृतदेह पुण्यातील नवले पुलावर आणत आंदोलन केले. त्यामुळे याठिकाणी तणावाचे वातावरण होते. त्याने पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक सुमारे चार तास खोळंबली होती. अखेर पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला, मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते. अखेर रात्री उशिरा पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना हटवले आणि उशिरा रात्री चिमुकलीवर अंत्यसंस्कार केले.

दरम्यान आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहे. त्या पदावर निवृत्त आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर, निवृत्त आयएएस मेधा गाडगीळ, स्त्री-भ्रूणहत्या संदर्भात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे, किंवा मनीषा गुप्ते यांची नियुक्ती करावी. या पैकी कोणाचीही नियुक्ती करा. परंतु राजकीय व्यक्ती महिला आयोगावर बसवू नका, याची दक्षता सरकारने घ्यायला हवी, असे पवार म्हणाले, तसेच शक्ती कायदा जो महाराष्ट्रातील अधिवेशनात पास करण्यात आला होता. तो शक्ती कायदा लवकरात लवकर महाराष्ट्रात लागू करावा अशी मागणी त्यांनी केली.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment