होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

मनमाड स्थानकातील कुंभमेळा ‘होल्डिंग एरिया’ची व्यवस्थापकांकडून पाहणी

On: May 11, 2026 5:12 PM
Follow Us:
---Advertisement---

Bhusaval News: मध्य रेल्वे भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी भुसावळ–मनमाड–नाशिक विभागाचे विस्तृत रियर विंडो निरीक्षण केले. प्रवासी सुविधा, संरक्षा कामे तसेच कुंभमेळा अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. रेल्वे अधिकारी व पर्यवेक्षकांना सर्व कामे वेळेत, गुणवत्तापूर्ण व सुरक्षित पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच मनमाड स्थानकातील कुंभमेळा होल्डिंग एरियाची व्यवस्थापकांनी पाहणी
केली.

नाशिक रोड स्थानक परिसर व आजूबाजूच्या भागात कुंभमेळ्यासंदर्भातील विविध विकासकामांचेही सविस्तर निरीक्षण पुनीत अग्रवाल यांनी केले. अधिका-यांसमवेत विकास कामांच्या ठिकाणी पाहणी करून प्रवासी व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण, सुरक्षा व्यवस्था तसेच पायाभूत सुविधांशी संबंधित योजनांचा आढावा घेतला. एकलहरे येथील टीएमडब्लू तसेच आरपीएफ ट्रेनिंग सेंटरचेही निरीक्षण केले. येथे उपलब्ध सुविधा, प्रशिक्षण व्यवस्था व प्रशासकीय कार्यपद्धतीची माहिती घेतली.

देवळाली स्थानकावरही कुंभमेळा कामांचे निरीक्षण केले व प्रवाशांच्या सुविधा व सुरक्षेला प्राधान्य देत सुरू असलेल्या विकासकामांच्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. रेल्वे व्यवस्थापकांनी मनमाड स्थानक परिसर, क्रू लॉबी, रनिंग रूम तसेच रेल्वे हेल्थ युनिटचे निरीक्षण केले. प्रवासी व रेल्वे कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणा-या सुविधांचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या. तसेच मनमाड स्थानकावर प्रस्तावित कुंभमेळा होल्डिंग एरिया व आरपीएफ चौकीसंदर्भातील बांधकाम व विकासकामांचेही निरीक्षण करण्यात आले आणि ही कामे निर्धारित कालावधीत गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

निफाड, नाशिक विभागात सुरक्षा उन्नतीकरणाच्या अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग हटच्या कामांचे निरीक्षण त्यांनी केले. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी संबंधित अधिका-यांकडून कामांच्या प्रगतीची माहिती घेत सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. निफाड, कसबेसुकेणे आणि खेरवाडी स्थानकांवर कुंभमेळ्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रवासी सुविधा व पायाभूत विकासकामांचाही आढावा घेण्यात आला. प्रवाशांची ये-जा अधिक सुलभ व सुरक्षित करण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांना गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment