होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

राज्याचा पारा किंचित घसरला; तुमच्या जिल्ह्याचे तापमान किती आहे ‘ते’ पहा

On: May 3, 2026 5:55 PM
Follow Us:
---Advertisement---

Letest Weather News: एप्रिल अखेर तापमान वाढले होते, विदर्भातच पारा काही ठिकाणी ४५ ते ४६ अंशावर गेल्याने वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. आगामी काळात तापमान आणखी नवा आकडा गाठेल अशी स्थिती होती, त्यामुळे ‘मे’ महिन्यात तापमान आणखी वाढेल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र मे महिन्याच्या सुरवातीलाच तापमान किंचित घट झाली आहे. वातावरणातील उष्मा कमी झाला असला तरी, मधून मधून उन्हाच्या झळा लागत आहे. आज हवामान कोरडे असले तरी शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाने २ ते ७ मे पर्यंत पावासाचा अंदाज वर्तविला आहे. त्याचा परिणाम दिसून येत आहे. आज राज्यात सार्वधिक कमाल तापमान ४४.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद वर्ध्यात झाली आहे, तर जळगावच्या तापमानात ही किंचित घट झाली आहे, जळगावचे तापमान ४१.८ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. सर्वात कमी तापमान ३१.२ महाबळेश्वर येथे नोंदवले गेले आहे.

सध्या तापमानाचा पारा किंचितसा कमी झाला असला तरी पुढील आठवड्यात पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळ हा नागरिकांची परीक्षा बघणारा आहे, त्यामुळे उन्हापासून काळजी घेण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले असून सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन केले आहे. दुपारी उन्हात फिरल्याने उष्माघाताचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे दुपारी १२ ते ४ दरम्यान नागरिकांनी आवश्यक असेल तरच बाहेर पडावे अन्यथा स्वतःची काळजी घ्यावी. तसेच उष्णतेपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना कराव्यात,

गेल्या २४ तासांतील पर्जन्यमान असे आहे, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे होते.
राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा येथे ४४.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे नोंद

गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सियसमध्ये)

मुंबई (कुलाबा) ३४.५,
सांताक्रूझ ३४.१,
अललबाग -,
रत्नागिरी ३३.५,
पणजी (गोवा) ३४.७,
डहाणू ३६.८,
पुणे ३७.०,
लोहगाव ३९.७,
अहिल्यानगर ४०.२,
जळगाव ४१.८,
कोल्हापूर ३६.४,
महाबळेश्वर ३१.२,
मालेगाव ४२.०,
नाशिक ३७.२,
सांगली ३९.१,
सातारा ३९.२,
सोलापूर ४२.८,
धाराशिव ४०.२,
छत्रपती संभाजीनगर ४१.५,
परभणी ४२.२,
नांदेड ४२.४,
बीड -,
अकोला ४३.९,
अमरावती ४४.०,
बुलढाणा ४१.०,
ब्रह्मपुरी ४३.८,
चंद्रपूर ४४.४,
गोंदिया ४१.२,
नागपूर ४३.८,
वाशीम ४१.८,
वर्धा ४४.५,
यवतमाळ ४२.६.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment