होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी शिंदे गटाचा पहिला उमेदवार जवळपास निश्चित

On: May 20, 2026 12:02 PM
Follow Us:
---Advertisement---

Vidhan Parishad Election 2026: राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशात विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी शिवसेनेचा (शिंदे गट) उमेदवार जवळपास निश्चित झाला आहे. या मतदार संघातून शिंदे यांच्या शिवसेनेने विप्लव बाजोरिया यांना उमेदवारी जाहीर केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. यासंदर्भात काल मुंबईत पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी बाजोरिया यांना कामाला लागायच्या सूचना दिल्या.  आहेत. यासंदर्भात आज किंवा उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बाजोरिया यांनी महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. मंगळवारी विप्लव बाजोरिया यांनी आपले वडील आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली.

 

मूळचे अकोल्याचे असलेल्या विप्लव बाजोरिया यांनी याआधीही या मतदारसंघाचे नेतृत्व केलं आहे. दरम्यान, विप्लव बाजोरिया यांचे वडील आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी स्वतःसाठी भाजपच्या ताब्यात असलेल्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर दावा केला आहे. या आधी त्यांनी 2022 मध्ये त्यांचा या मतदारसंघात भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी पराभव केला होता. त्यानुसार, त्यांनी या मतदार संघात सलग तीन वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. गेल्यावेळी गोपीकिशन आणि विप्लव बाजोरिया हे दोन्ही पिता-पुत्र एकाच वेळी विधान परिषदेत होते.

राष्ट्रवादी (अजित पवार गट) अन् भाजपमध्ये रस्सीखेच

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या या जागेवर राष्ट्रवादीचे अनिल भोसले निवडून आले होते. त्यामुळं या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्क आहे, असं म्हणत पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे विधानपरिषदेच्या जागेवर दावा केला आहे. पुणे जिल्ह्यात भाजपपेक्षा राष्ट्रवादीची पकड मजबूत आहे. त्यामुळे यंदा पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला उमेदवारी द्यावी, अशी ही मागणी समर्थकांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे केली आहे.

 

जिल्ह्यात राष्ट्रवादीचे 348 मतं तर भाजपची 319 मतं आहेत, शिंदे शिवसेनेच्या 68 मतांची ही साथ भेटणार असल्यानं फूट न पडल्यास महायुतीचा उमेदवार निवडून येणार हे उघड आहे. त्यामुळंचं उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादीकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment