होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

जळगावकरांनो पाणी जरा जपून वापरा; ‘हतनूर’ आणि ‘वाघूर’च्या पाणीसाठ्यात घट..

On: May 18, 2026 6:37 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीत जळगावला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणी पातळीत घट झाली आहे, जळगावला हतनूर आणि वाघूर या मुख्य धरण प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो. यंदाच्या कडक उन्हयामुळे पाणी साठयात घट दिसून येत आहे. हतनूरमध्ये उपयुक्तसाठा २५५ द.ल.घ.मी. इतका आहे. म्हणजेच प्रकल्पात २८.८६ टक्केच पाणी उपलब्ध आहे, तर वाघूर धरणात ही उपयुक्तसाठा हा २४८ द.ल.घ.मी इतका असून ६९.८५ इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. हतनूरमध्ये यंदा ३.२८ टक्के पाणीसाठ्यात घट झाली आहे. तर वाघूर प्रकल्पात १.३६ टक्के घट दिसत आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पात उपलब्ध साठ्यात घट झाली असल्याने जळगावकरांना पाणी सांभाळून वापरावे लागणार आहे. खास करून हतनूर धरणातील पाणीसाठा कमालीचा कमी झाला आहे,

तापमानाचा पारा वाढत आहे तसा धरण समुहातील पाणी साठ्यावर देखील परिणाम दिसून येत आहे, ऊर्ध्व तापी हतनूर धरणात आजचा पाणीसाठा २०६.६० द.ल.घ.मी. इतका आहे, प्रकल्पात मृत आणि उपयुक्त असा एकूण पाणीसाठा ३८८ द.ल.घ.मी. आहे, परंतु उपयुक्तसाठा २५५ द.ल.घ.मी. आहे. तर त्यातही आजचा साठा हा ७३.६० इतका आहे, त्यामुळे ऊर्ध्व तापी हतनूर धरण प्रकल्पात आजचा उपयुक्त साठा २८.८६ टक्के असून गत वर्षी ३२.२४ टक्के पाणीसाठा होता. यंदा ३.३८ टक्क्याने पाणी साठ्यात घट झाली आहे.

वाघूर धरणात हे उपलब्ध साठ्यात घट झाली आहे. या धरण प्रकल्पात मृत आणि उपयुक्त असा एकूण पाणीसाठा ३२५ द.ल.घ.मी. इतका आहे. आजचा ६९.८५ टक्के साठा आहे. मागील वर्षी यंदा ७१.२१ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता, त्यात या वर्षी १.३६ टक्क्याने साठ्यात घट झाली आहे. आजचा एकूण पाणीसाठा हा २५०.१६ द.ल.घ.मी इतका साठा दाखवत आहे. प्रकल्पात मृत साठा सोडला तर खरासाठा हा २४८ द.ल.घ.मी. उपलब्ध आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment