होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

राज्यातील तापमान किती आहे ‘ते’ बघा; जळगावकरांची उष्णतेने होरपळ कायम!

On: May 14, 2026 7:13 PM
Follow Us:
---Advertisement---

Letest Weather News: राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४५.९ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे. तर कमल तापमान ३१.४ महाबळेश्वर यहे नोंदवण्यात आले आहे. अकोल्या पाठोपाठ अमरावतीत कमाल ४५.८ तर जळगावमध्ये आज ४५.६ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदवण्यात आले आहे. जळगावात गुरुवारी ४५.५ इतके तापमान होते, गेल्या काही दिवसांपासून जळगाव भाजल्यागत स्थिती झाली आहे, उष्णतेने जळगावकरांची होरपळ कायम आहे, दिवसभर उन्हाचे चटके सहन करावे लागतात, सावलीत ही उष्णतेच्या झळा बसतात. त्यामुळे जीवाची काहिली होत आहे. गेलं काही दिवस तापमान असेच राहण्याही चिन्हे दिसत आहेत. जळगावकरांनो काही दिवस जरा जपून राहा. उष्माघाताचे प्रमाण हळूहळू वाढत आहे.

गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. कोकण आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात १४ ते १६ असा तीन दिवस हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. कमी दाबाच्या क्षेत्राच्या केंद्रापासून एक द्रोणी (ट्रफ) नैऋत्य लगतच्या पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावरून दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत पसरलेली आहे.

 

गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सियसमध्ये)

मुंबई (कुलाबा) ३४.९,
सांताक्रूझ ३४.२,
अलिबाग ३६.८,
रत्नागिरी ३३.९,
पणजी (गोवा) ३६.२,
डहाणू ३५.८,
पुणे ३९.०,
लोहगाव ४१.४,
अहिल्यानगर ४१.२,
जळगाव ४५.६
कोल्हापूर ३५.०,
महाबळेश्वर ३१.४,
मालेगाव ४३.४,
नाशिक ३८.५,
सांगली ३८.३,
सातारा ४०.२,
सोलापूर ४१.१,
धाराशिव ४१.१,
छत्रपती संभाजीनगर ४३.४,
परभणी ४२.९,
अकोला ४५.९,
अमरावती ४५.८,
बुलढाणा ४३.३,
ब्रह्मपुरी ४३.२,
चंद्रपूर ४२.८,
गोंददया ४१.४,
नागपूर ४४.२,
वाशीम ४२.६,
वर्धा ४५.०,
यवतमाळ ४२.२.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment