IPL 2026: आयपीएल २०२६ च्या लीग टप्प्याच्या अंतिम दिवशी राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात अंतिम प्लेऑफ जागेसाठी एक रोमांचक लढत पाहायला मिळेल. राजस्थानला विजय मिळवून थेट अंतिम चार मध्ये प्रवेश करता येईल, तर पंजाब आणि कोलकाताच्या आशा इतर सामन्यांच्या निकालांवर आणि त्यांच्या नेट रन रेटवर अवलंबून असतील. अखेरच्या सत्राकडे झाकलेली ही स्पर्धा आता चुरशीची होण्याची शक्यता आहे. (IPL 2026)
आयपीएल २०२६ च्या लीग टप्प्यातील शेवटचे दोन सामने रविवारी खेळले जातील, ज्यातून प्लेऑफसाठी चौथा संघ निश्चित केला जाईल. त्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी अंतिम चार संघांमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. तसेच राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आता अंतिम जागेसाठी लढत आहेत.(IPL 2026)
आज दिवसाच्या पहिल्या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने येतील, तर दुसऱ्या सामन्यात ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होईल. दिल्ली आणि मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलय आहेत, परंतु त्यांच्या कामगिरीवर उर्वरित संघांचे भवितव्य अवलंबून असेल.(IPL 2026)

राजस्थानला सर्वात मोठी संधी आहे
दरम्यान राजस्थान रॉयल्स हा संघ सध्या १३ सामन्यांमधून १४ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. संघाला चांगली संधी आहे, मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवल्यास राजस्थानला थेट प्लेऑफमध्ये स्थान मिळेल आणि इतर सर्व संघ शर्यतीतून बाहेर होतील. मात्र, पराभव झाल्यास किंवा सामना रद्द झाल्यास राजस्थान स्पर्धेतून बाहेर होईल. रियान पराग खेळणार की नाही हे अजूनही अनिश्चित आहे. जर तो खेळला नाही, तर युवा कर्णधार यशस्वी जैस्वालवर संघाला विजय मिळवून देण्याची मोठी जबाबदारी येईल. वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल आणि जोफ्रा आर्चर यांसारख्या खेळाडूंकडून संघाला दमदार कामगिरीची अपेक्षा राहील.(IPL 2026)
दोन्ही संघांच्या कामगिरीवर लक्ष टाकूया, मुंबई आणि राजस्थान यांच्यात आतापर्यंत ३१ सामने झाले असून, मुंबईने १६ आणि राजस्थानने १५ सामने जिंकले आहेत. वानखेडे स्टेडियमवर मुंबई ५-४ ने आघाडीवर आहे, परंतु २०२३ पासून झालेल्या सात सामन्यांपैकी चार सामने राजस्थानने जिंकले आहेत. त्यामुळे राजस्थान दावा मजबूत मनाला जात आहे परंतु मुंबई एक असा संघ की जे कधी ही कमबॅक करू शकतो. पण सर्वात जास्त जोर राजस्थानला लावावा लागणार आहे.(IPL 2026)









