होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ, सोन्याचे दर किती वाढले ‘ते; जाणून घ्या!

On: May 13, 2026 8:24 PM
Follow Us:
---Advertisement---

Gold News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसापूर्वी वर्षभर सोनं खरेदी करू नका, असे देशवासियांना आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनानंतर केंद्र सरकारने रात्रीतून मोठा निर्णय घेत जनतेला मोठा धक्का दिला आहे. सरकारने सोन्यावर लागणारे आयात शुल्क वाढवले आहे. आयात शुल्क 6 टक्क्यांवरुन 15 टक्के केले आहे. सरकारच्या या निर्णयाने आता सोने-चांदीचे दर 8808 रुपयांनी वाढले आहे. एमसीएक्सवर आजचे सोन्याचे दर 162399.00, सोने 8959.00 रुपयांनी वाढले आहे, ही वाढ ५.८४ टक्के इतकी नोंदवण्यात आली आहे. त्यानंतर मंगळवारी 153442.00 सोने बाजार बंद झाले होते. सकाळी बाजार उघडले तेव्हा सोने दर 154851.00 इतका होता, दुपारच्या सत्रात सोन्याच्या दारात वाढ झाली. त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ होणार आहे.

सोने चांदीचे दर वाढल्याने थेट सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे. सरकारने सोने-चांदीवर आयात शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे. सोने, चांदी आणि इतर अनेक धातूंवरील आयात शुल्क वाढवल्याची घोषणा केली आहे. अर्थ मंत्रालयाने मंगळवारी याबाबत माहिती दिली. आजपासून हे नवीन शुल्क लागू होणार आहे, असे सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारने आयात शुल्क वाढवल्याने सोने-चांदीचे दर वाढल्याचे दिसून आलं आहे. परदेशात सोन्याच्या दरात चांगलीच वाढ होण्याचे संकेत मिळत असल्याने त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे आहे.

सरकारने आयात शुल्क वाढवले

सरकारने आयात शुल्क वाढले असून ते 6 टक्क्यांवरुन 15 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. बेसिक कस्टम ड्यूटी 5 टक्क्यांनी वाढवून 10 टक्के केली आहेत. यानंतर कृषी पायाभूत आणि विकास शुल्कात 1 टक्क्यांनी वाढ केली आहे. हे शुल्क आता 5 टक्के करण्यात आले आहे. तसेच युएई येथील कोट्यातून आयात होणाऱ्या सोन्यावर देखील सर्वात जास्त आयात शुल्क मोजावे लागणार आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

केतन हत्याकांडानंतर आणखी एक घटना उघडकीस; पत्नीने प्रियकर सोनूच्या मदतीने काढला मोनूचा काटा

ISRO Gets Bomb Threat: इस्रोच्या बंगळुरू मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी, यंत्रणा अलर्ट

23 political parties Letter to Chief Justice over SIR: निवडणूक आयोगाच्या कारभारावर नाराजी! देशातील 23 विरोधी पक्षांचे सरन्यायाधीशांना पत्र

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत भेटीवर येणार, परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांचा दुजोरा

बापरे..! शतकातील सर्वात मोठा भूकंप: मृतांची संख्या २३५ वर; जाणून घ्या कुठे घडली घटना..

बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या ‘नाफेड’ला नफा; डाळीचा प्रत्येक दाणा थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करणार: केंद्रीयमंत्री अमित शहा

Leave a Comment