होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

कॉकरोचची धमाल, फॉलोवर्सची कमाल; इंस्टावर कॉकरोच जनता पार्टीचे सार्वधिक फॉलोवर्स! भाजप- काँग्रेसला किती फॉलोवर्स आहे ‘ते’ बघा?

On: May 21, 2026 7:50 PM
Follow Us:
---Advertisement---

Cockroach Janta Party: अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या कॉकरोच जनता पार्टीने धमाल उडवून दिली आहे, देशातील बेरोजगार आणि इतर लोक पक्षाला फॉलो करून फॉलोवर्सने देखील कमाल केली आहे. आजकाल ‘कॉकरोच जनता पार्टी’ हे अनोखे नाव सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ते सुरू झाल्याच्या अवघ्या सहा दिवसांतच १ कोटी ३६ लाख पेक्षा जास्त लोकांनी या पक्षाला इंस्टाग्रामवर फॉलो केले आहे. फॉलोअर्सच्या बाबतीत, या पक्षाने भाजप आणि काँग्रेसच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यांनाही मागे टाकले आहे. राजकीय पक्षांना ही मागे टाकल्याने सध्या देशभर या हॅण्डलची चर्चा आहे.

२१ मे रोजी, या खात्याने इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर १ कोटी ३६ लाख फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला. दरम्यान, केंद्रातील सत्ताधारी भाजपचे अधिकृत इंस्टाग्राम हँडल, @bjp4india, चे सुमारे ८८ लाख फॉलोअर्स आहेत. तर दुसरीकडे, विरोधी पक्ष काँग्रेसच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावर, @incindia, सुमारे १ कोटी ३३ लाख दशलक्ष फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवरील या हॅण्डलचे यश बघून ते नेमके कोणी सुरू केले आहे, आणि त्याचा उद्देश काय हे जाण्याचा ही बरेच जण प्रयत्न करीत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार युवकांसाठी झुरळ शब्दाचा वापर केला होता, त्यानंतर युवकांमध्ये नाराजीची भावना होती. अशाच नाराज युवकांची नस पडून अभिजित दिपके नावाच्या युवकाने कॉकरोच जनता पार्टी नावाने इन्स्टा खाते सुरू केले, झेन-झेडच्या पसंतीचे असलेल्या फ्लॅटफॉर्मवर या खात्याला अवघ्या सहा दिवसात १ कोटी पेक्षा जास्त फॉलोवर्स मिळाले आहे. त्याला खा. महुआ मोईत्रा आणि मा.खा.कीर्ती आझाद यांनीही पाठींबा दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

CJP म्हणजेच काँग्रेस जिताओ प्रोग्रॅम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका

मतदार याद्यात चोरी करण्याचा भाजपचा डाव: हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप नाशिकला काँग्रेसच्या १० दिवसीय शिबिरास सुरुवात..समारोपाला राहुल गांधी यांची उपस्थिती

मंत्री भुजबळ म्हणाले, मनोज जरांगे यांची लढाई आमच्या विरोधात नाही!

पुणे राज्याचे लक्ष वेधणार: विरोधी पक्षनेते राहुल गांधींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही लवकरच दौरा? पुणे मेट्रोच्या उदघाटनासाठी येण्याची शक्यता

नंदुरबारचे पदाधिकारी विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी; भाजप मंत्र्यांसोबतच्या ऑडिओ क्लिपमुळे पडली विकेट?

तिढा सुटला: नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन तर रायगडला भरत गोगावले यांची नियुक्ती

Leave a Comment