होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

होर्मुझ ते युरेनियम हस्तांतरणापर्यंत, अमेरिका-इराणच्या संभाव्य करारामध्ये आणखी काय समाविष्ट आहे ‘ते’ जाणून घ्या.

On: May 24, 2026 1:16 PM
Follow Us:
---Advertisement---

America Iran Peace Talk: अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करारासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे, त्यादृष्टीने अमेरिका आणि इराणचे वार्ताकार मुसुदा अंतिम करण्याचा प्रयत्न करत आहेत, होर्मूझ सामुद्रधुनी खुली कारण्यावर अजूनही दोन्ही पक्षात एकमत होत नसल्याने तसेच युरेनियम साठा हस्तांतराबाबत ठोस निर्णय होत नसल्याने कराराचा मसुदा अंतिम करण्यात अडचणी येत आहे. ६० दिवसांचा संभाव्य करार होण्याची चिन्हे दिसत असून त्यात आणखी कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश आहे हे जाणून घेणार आहोत. (America Iran Peace Talk)

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरू होण्याची शक्यता

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, युद्ध संपवण्यासाठी आणि होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यासाठी अमेरिका इराणसोबत करार करण्याच्या जवळ आहे. तथापि, त्यांनी कोणताही तपशील दिला नाही. या प्रस्तावित करारामुळे भविष्यातील तणाव कमी होईल आणि ऊर्जा पुरवठ्याला तात्पुरता दिलासा मिळेल, असे मानले जात आहे. (America Iran Peace Talk)

मात्र, इराणी माध्यमांनी ट्रम्प यांच्या दाव्याला आव्हान दिले आहे. प्रस्तावित करारानुसार होर्मुझ सामुद्रधुनी तिच्या पूर्वीच्या स्थितीत परत येईल, हा ट्रम्प यांचा दावा इराणने रविवारी फेटाळून लावला. इराणच्या निम-सरकारी ‘फर्स’ वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, तेहरान होर्मुझवर आपले नियंत्रण कायम ठेवेल. अहवालानुसार, इराणने केवळ जहाजांची संख्या युद्धापूर्वीच्या पातळीवर परत आणण्यास परवानगी देण्यास सहमती दर्शवली आहे.

शांतता कराराचे प्रमुख मुद्दे कोणते आहेत?

होर्मुझची सामुद्रधुनी:- ट्रुथसोशलवरील एका पोस्टमध्ये, ट्रम्प यांनी म्हटले आहे की, “या करारामध्ये होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याचा समावेश आहे. हा एक महत्त्वाचा सागरी मार्ग आहे, जो इराणने २८ फेब्रुवारीपासून रोखून धरला आहे, ज्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारात खळबळ माजली आहे. एका अहवालानुसार, ही सामुद्रधुनी ६० दिवसांच्या कालावधीसाठी टोलशिवाय उघडली जाईल आणि तेहरान या सामुद्रधुनीमध्ये पेरलेले भूसुरुंग हटवण्यास सहमत होईल.”(America Iran Peace Talk)

इराणचा अणुकार्यक्रम:- एका अहवालानुसार, या करारामध्ये इराणने आपले संवर्धित युरेनियम सोडून देण्याची स्पष्ट वचनबद्धता समाविष्ट आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, “इराण आपला युरेनियमचा साठा कसा सुपूर्द करेल हे अद्याप ठरलेले नाही. या मुद्द्यावर भविष्यातील अणुचर्चांत चर्चा केली जाईल.”(America Iran Peace Talk)

तीन टप्प्यांत शांतता:- प्रस्तावित शांतता चर्चा तीन टप्प्यांत पार पडेल. यामध्ये पश्चिम आशियाई संघर्ष औपचारिकपणे संपुष्टात आणणे, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील संकट सोडवणे आणि एका व्यापक करारावर वाटाघाटी करण्यासाठी ३० दिवसांच्या वाटाघाटी सुरू करणे यांचा समावेश असेल.

इराणचा परकीय निधी:- इराणने जप्त केलेला आपला परकीय निधी देण्याची मागणी केली आहे. तथापि, अमेरिकेने म्हटले आहे की हे केवळ ठोस
सवलतींनंतरच शक्य होईल.(America Iran Peace Talk)

इराणची तेल विक्री:- होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याच्या अमेरिकेच्या मागणीच्या बदल्यात, इराणने सामुद्रधुनीवर देखरेख, इराणी बंदरांवरील अमेरिकेची नाकेबंदी समाप्त करणे आणि इराणी तेल विक्रीवरील निर्बंध हटवण्याची मागणी केली आहे.

लेबनॉनमधील लढाई संपवणे:- या करारामध्ये हे देखील स्पष्ट केले आहे की लेबनॉनमधील इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील युद्ध संपलेच पाहिजे. बेरूतवरील अलीकडील इस्रायली हल्ल्यामुळे या शांतता योजनेला धोका निर्माण झाला होता. अमेरिकेने म्हटले होते की, जर हिजबुल्लाने पुन्हा शस्त्रसज्ज होण्याचा किंवा हल्ले भडकवण्याचा प्रयत्न केला, तर तेल अवीवला कारवाई करण्याची परवानगी दिली जाईल.(America Iran Peace Talk)

या करारावर इराणची भूमिका अशी आहे, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, अमेरिकेच्या मध्यस्थीने तेहरानसोबत सुरू असलेल्या चर्चेत मतभेद अजूनही तीव्र आणि महत्त्वपूर्ण आहेत. प्रवक्त्याने पुढे सांगितले की, औपचारिक करारासाठी अजूनही महत्त्वपूर्ण अडथळे आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment