होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

कानळदा रोडवर मध्यरात्री भीषण अपघात; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

On: May 2, 2026 4:27 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: शहरातील कानळदा रोडवरील समर्थ लॉनजवळ दुचाकीला झालेल्या या अपघातात 27 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. मात्र, मृतदेहाची अवस्था आणि घटनास्थळाची परिस्थिती पाहता नातेवाईकांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

अक्षय संजय देशमुख (वय 27) आणि त्याचा मित्र गणेश पवार हे दोघे धानोरा येथून आपल्या मित्राच्या लग्नानिमित्त आयोजित हळदीचा कार्यक्रम आटोपून जळगावकडे परतत होते. मध्यरात्री 11.30 ते 12 वाजेच्या सुमारास कानळदा रोडवरील समर्थ लॉनजवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या घटनेत अक्षय देशमुख याचा जागीच मृत्यू झाला, तर गणेश पवार हा गंभीर जखमी झाला आहे. जखमी गणेशवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

या घटनेची माहिती मिळताच अक्षयच्या नातेवाईकांनी रुग्णालयात आणि घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अक्षयच्या शरीरावर अपघाताच्या तुलनेत इतर जखमांचे प्रमाण कमी असणे आणि दुचाकीचेही फारसे नुकसान न झाल्याने नातेवाईकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे. हा निव्वळ अपघात असू शकत नाही, तर हा घातपाताचा प्रकार आहे, असा आरोप अक्षयच्या भावाने आणि नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणाची पोलिसांनी तातडीने आणि सखोल चौकशी करावी, अशी मागणी कुटुंबाकडून करण्यात आली आहे.

या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. हा खरोखरच अपघात आहे की त्यामागे काही वेगळे कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून अक्षयच्या मृत्यूने देशमुख परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नगरसेवकासह नागरिकांचा रास्ताराको

कानळदा रोडवरील समर्थ लॉनजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीस्वार 27 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. हा रस्ता खचल्यामुळे चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटते, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता त्वरितदुरुस्त करून द्यावा, यासाठी आज सकाळी शिवाजीनगर भागातील नागरिक व कानळदा रस्त्यावरील रहिवासी भाजप नगरसेवक विजय बांदल कार्यकर्त्यांसह शनिवारी सकाळी 10 वाजता रास्तारोको आंदोलनासाठी बसले होते. यावेळी कानळदा व जळगावकडील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढीत रस्ता मोकळा करून दिला.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment