Latest Weather Update: भारतीय हवामान विभागाच्या मुंबई कुलाबा हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी हवामानविषयक अंदाज जारी केला आहे. ५ ते ९ जून दरम्यान महाराष्ट्रात (गोवा सह) हवामान अंदाज कसा आहे, याची माहिती दिली आहे. दि.०५ जून: कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी; तसेच विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर ०६ जून: महाराष्ट्र आणि गोवा राज्यांत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दि.०७ – ०८ जून रोजी कोकण-गोव्यात काही ठिकाणी; तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची इशारा दिला आहे.

हवामान विभागाचा इशारा
०५ जून: कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्र येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि ४०-५० किमी/तास वेगाच्या सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळाची शक्यता. दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर वारे ४०-५० किमी/तास (झोतासह ६० किमी/तास) वेगाने वाहण्याची शक्यता.
०६ जून: कोकण-गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. कोकण-गोवा आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि ४०-५० किमी/तास वेगाच्या सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळाची शक्यता.
०७ जून: महाराष्ट्र आणि गोवा राज्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि ४०-५० किमी/तास वेगाच्या सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळाची शक्यता.
०८ जून: कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्र येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि ४०-५० किमी/तास वेगाच्या सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळाची शक्यता.








