होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

जनगणनेमुळे बदल्यांचा 31 मेचा मुहूर्त टळणार; पोलीस, महसूल, जिल्हा परिषद विभागातील सुमारे 1900 कर्मचार्‍यांच्या बदल्या रखडल्या

On: May 29, 2026 1:21 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News:  जनगणनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील शासकीय कर्मचार्‍यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचारी बदल्यांचा 31 मेचा मुहूर्त टळणार आहे.  तसेच शासनाला 30 जूनपर्यंत बदली प्रक्रिया राबविता येणार आहे. या निर्णयामुळे महसूल, जिल्हा परिषद आणि पोलिस प्रशासनातील सुमारे 1900 कर्मचार्‍यांचा मुक्काम आणखी महिनाभरासाठी वाढणार आहे.

राज्य शासकीय कर्मचार्‍यांच्या बदल्यांसाठी दरवर्षी दि. 31 मे ही अंतिम मुदत मानली जाते. त्यानंतर केवळ प्रशासकीय गरजेनुसार किरकोळ बदल्या केल्या जातात. यंदाही बदल्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली होती. मात्र ऐनवेळी मुदतवाढ जाहीर झाल्याने बदल्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचार्‍यांचे नियोजन विस्कळीत झाले आहे.देशात जनगणना 2027 अंतर्गत पहिल्या टप्प्याचे काम सुरू असून 16 मे ते 14 जून या कालावधीत घरयादी तयार करणे आणि घरगणना प्रक्रिया राबविली जाणार आहे. या कामासाठी नियुक्त कर्मचार्‍यांच्या बदल्या करू नयेत, असे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला बदल्यांच्या अधिनियमात सुधारणा करून मुदतवाढ देण्याचा निर्णय घ्यावा लागला. बदल्यांना मुदतवाढ देण्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा आवश्यक असल्याने राज्यपालांच्या मान्यतेने अध्यादेश जारी करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

त्यामुळे आता सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया जूनच्या अखेरीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. महसूल विभागात 29 मे रोजी बदल्यांचे आदेश जारी होण्याची शक्यता होती. 30 आणि 31 मे रोजी सुटी येत असल्याने त्याआधीच प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी सुरू होती. समुपदेशनाची रूपरेषाही निश्‍चित करण्यात आली होती. मात्र मुदतवाढीच्या निर्णयामुळे ही प्रक्रिया आता जूनच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.= 1900 कर्मचार्‍यांच्या बदल्या रखडल्या

महसूल विभागातील सुमारे 152, पोलिस विभागातील 1600 आणि जिल्हा परिषदेमधील जवळपास 200 कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू होती. मात्र अचानक मुदतवाढ मिळाल्याने या सर्व बदल्या आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाने मे महिन्याच्या सुरुवातीलाच 97 कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले होते. त्यातील अनेकांना कार्यमुक्तदेखील करण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित कर्मचार्‍यांच्या बदल्या लांबल्याने आधीच बदली झालेल्या कर्मचार्‍यांना लकी मानले जात असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment