होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Kalyan Crime News : धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून व्यावसायिकाला 55 लाखांत लुटले; दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

On: May 28, 2026 5:38 PM
Follow Us:
---Advertisement---

Kalyan Crime News : लग्नाचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक झाल्याच्या घटना आपण नेहमीच ऐकत असतो.  मात्र, कल्याणमध्ये याच्याविरुद्ध घटना घडली आहे. या ठिकाणी लग्नाचे आमिष दाखवून चक्क दोन महिलांनी एका व्यावसायिकाची तब्बल 55 लाखांत फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी दोन्ही आरोपी महिलांना अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, कल्याण पश्चिमेतील एका नामांकित दुकानाच्या मालकाची ओळख मुंबईत राहणाऱ्या रोमा परदेशी हिच्याशी झाली होती. जयश्री पाटील हिने ही ओळख करून दिली होती. रोमा एका मोठ्या इन्शुरन्स कंपनीत काम करत असल्याचे सांगत तिने व्यावसायिकाशी जवळीक वाढवली. सुरुवातीला इन्शुरन्स पॉलिसीच्या माध्यमातून ओळख निर्माण केली आणि त्यानंतर विश्वास संपादन केला. रोमा परदेशी हिने इन्शुरन्स च्या नावाखाली व्यवसायिकाकडून लाखो रुपये घेतले मात्र, इन्शुरन्स पॉलिसी उघडण्यात आली नाही. काही दिवसानंतर रोमा हिने जयश्री पाटील मार्फत संबंधित व्यावसायिकासोबत लग्न करण्याची तयारी दर्शवली. लग्नासाठी होकार दिल्यानंतर दोन्ही महिलांनी वेळोवेळी विविध कारणे सांगत संबंधित व्यावसायिकाकडून पैसे घेतले. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत सुमारे 55 लाख रुपये या दोघींना दिले आहेत. फसवणुकीची बाब लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने महात्मा फुले पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली.

 दोघं महिलांना अटक

या प्रकरणात पोलिसांनी काही दिवसांपूर्वी रोमा परदेशी हिला अटक केली होती. तपासादरम्यान पोलिसांनी तिची मैत्रीण जयश्री पाटील हिला कोल्हापूरमधून अटक केली. तक्रारदार व्यावसायिकाने पोलिसांकडे आपले पैसे परत मिळवून देण्याची मागणी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

पाऊले चालती पंढरीची वाट… संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेला पालखी करणार प्रस्थान

Jalgaon News: जळगाव विधान परिषद निवडणूक; अपक्ष उमेदवार महायुतीचे गणित बिघडवणार, 16 उमेदवार रिंगणात

गुटखा माफियांचे धाबे दणाणले, राज्यातील कारवाईत ‘इतक्या’ जणांच्या मुसक्या आवळल्या

पुणे- पिंपरी चिंचवड दारू भेसळप्रकरणी ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड

Monsoon Rain El NINO: राज्यात यंदा कमी पाऊस, जून महिन्यात उष्णतेच्या लाटा; हवामान तज्ज्ञांचा अंदाज

11th Admission: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार; विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज

Leave a Comment