होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

चोपड्यात कुंटणखान्यावर छापा; दोघे अटकेत, ११ जणांवर गुन्हा दाखल

On: May 30, 2026 5:31 PM
Follow Us:
---Advertisement---

Chopda Crime News: चोपडा शहरातील तहसील कार्यालयाच्या मार्गाने स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रोड लगत, मोकळ्या जागेत पत्राच्या झोपड्यांमध्ये देहविक्रीचा व्यवसाय चालणाऱ्या कुंटनखान्यावर पोलिसांनी छापा घालून अवैधरित्या वेशा व्यवसाय करवून घेणाऱ्या 2 जणांना अटक केली आहे. पोलिसांना चकवा देऊन 9 जण फरार झाले आहेत. दरम्यान राजस्थान व नेपाळ व चोपड्यातील एक महिला अशा एकुण सहा पीडितांना आश्रय देऊन देह व्यापार चालवणाऱ्याची पोलिसांनी धरपकड केल्याने खळबळ उडाली आहे. शहर पोलिसांच्या धडक कारवाईचे जोरदार स्वागत होत आहे.

दरम्यान चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन प्रतापराव भोसले यांच्या नेतृत्वात सपोनी एकनाथ भिसे, पोउनि युवराज वाळुंज, पोउनि सचिन चौधरी यांच्या पथकाने दुपारच्या सुमारास शहरातील एका हायस्कूलच्या मागे तहसील कार्यालयाच्या मार्गाने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रोड लगत असलेल्या मोकळ्या जागेतील पत्रांच्या झोपड्यांमध्ये कुंटणखाना सुरू असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलीस छापा मारला. त्यात नेपाळ, राजस्थान व चोपडा येथील सहा महिलांकडून स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी आश्रय देऊन वेश्याव्यवसाय करून घेणारे आढळून आल्याने शिल्पा राम लामा (वय ३५ रा.चोपडा) ,व पूजा टीकराम थापा (वय २९ रा.चोपडा) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

तर शिवाजी भीमराव पाटील, फरीद कदीर शेख, शाहरुख वाहिद खान, शरीफ रमजान तेली, कालू उर्फ रंजीत चौधरी, फिरोजी इशा खान, बापू उर्फ जितेंद्र रावण वाडे, संदीप उर्फ सोनू लक्ष्मण पाटील, सुरेंद्र राजपूत चोपडा हे फरार झाले आहेत. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल मदन रतिलाल पावरा यांच्या फिर्यादीवरून सी.सी.टीएनएस गु.र.नं. 224- 2006 स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार,(प्रतिबंध) अधिनियम 1956 (PITA) च्या कलम 3 ,4,5,7 व भारतीय न्यायसहिता कलम 143 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन प्रतापराव देसले हे करीत आहेत.

पोनि देसलेंचा चोपड्यात धडाका

चोपडा शहर पोलीस स्टेशनचा पदभार हाती घेताच पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे, गांजा ,गावठी कट्टा ,अवैध गुरे गायी कत्तल, अवैध देह व्यापार ,बालविवाह प्रतिबंध अशा प्रकारे अवैद्य धंद्यांवर लगाम लावण्याच्या धडका लावला आहे.त्यामुळे पोनि पवन देसले यांच्या रूपाने चोपड्याला धडाकेबाज निडर “सिंघम “लाभल्याची प्रतिक्रिया जनसामान्यांतून उमटत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment