Water Storage Jalgaon: पावसाचे आगमन यंदा उशिराने होणार आहे, त्यात अल निनोचा प्रभाव असल्याने पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मान्सूनचे आगमन यंदा केरळात ४ जून रोजी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे १५ जून नंतरच पाऊस राज्यात सक्रिय होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीत जळगावला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणी पातळीत घट झाली आहे, जळगाव आणि भुसावळला वाघूर आणि हतनूर या मुख्य धरण प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो. यंदाच्या कडक उन्हयामुळे पाणी साठयात घट दिसून येत आहे. हतनूरमध्ये उपयुक्तसाठा २५५ द.ल.घ.मी. इतका आहे. म्हणजेच प्रकल्पात १९.५७ टक्केच पाणी उपलब्ध आहे, तर वाघूर धरणात ही उपयुक्तसाठा हा २३९.९९ द.ल.घ.मी इतका असून ६५.७५ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.
हतनूरमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ३५.१४ टक्के पाणीसाठ्यात घट झाली आहे. तर वाघूर प्रकल्पात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा २.९१ टक्के घट दिसत आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पात उपलब्ध साठ्यात घट झाली असल्याने जळगावकर आणि भुसावळकरांना पाणी सांभाळून वापरावे लागणार आहे. खास करून हतनूर धरणातील पाणीसाठा कमालीचा कमी झाला आहे. भुसावळकर पाणी जरा जाणूनच वापरावे लागणार आहे.

तापमानाचा पारा यंदा जास्त होता, सध्या राज्यात पारा उतरला आहे, पण अल निनोमुळे पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात ही उशिरा दाखल होणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे लागेल, सध्या धरण समुहातील पाणी साठ्यावर देखील परिणाम दिसून येत आहे, ऊर्ध्व तापी हतनूर धरणात आजचा पाणीसाठा १८२.९० द.ल.घ.मी. इतका आहे, प्रकल्पात मृत आणि उपयुक्त असा एकूण पाणीसाठा ३८८ द.ल.घ.मी. आहे, परंतु उपयुक्तसाठा २५५ द.ल.घ.मी. आहे. तर त्यातही आजचा उपयुक्तसाठा हा ४९.९० इतका आहे, त्यामुळे ऊर्ध्व तापी हतनूर धरण प्रकल्पात आजचा उपयुक्त साठा १९.५७ टक्के असून गत वर्षी ५४.७१ टक्के पाणीसाठा होता. यंदा ३५.१४ टक्क्याने पाणी साठ्यात घट झाली आहे.









