होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

IPL Mega Clash:’आरसीबी’समोर विजेतेपद कायम ठेवण्याचे आव्हान; गुजरात टायटन आरसीबीला रोखणार का?

On: May 31, 2026 4:22 PM
Follow Us:
---Advertisement---

IPL 2026 Final: आयपीएल २०२६ चा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. ७० साखळी सामने, एक एलिमिनेटर आणि दोन क्वालिफायर सामन्यांनंतर, गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात अंतिम सामना होणार आहे. दोन्ही संघ आमनेसामने येतील. या महासंग्रामचा अंतिम सामना रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणारा आहे. आरसीबी आपले जेतेपद कायम राखण्याचा प्रयत्न कार्ल तर गुजरात २०२२ नंतर दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.

आरसीबी विरुद्ध जीटी सामन्यांचे रेकॉर्ड काय सांगतात?

आयपीएलच्या इतिहासात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात आतापर्यंत एकूण नऊ सामने झाले आहेत. यापैकी पाच सामने आरसीबीने जिंकले आहेत, तर गुजरातने चार सामन्यांमध्ये यश मिळवले आहे. आकडेवारीवरून असे दिसते, या दोन संघांमध्ये नेहमीच चुरशीची लढत झाली आहे.एकूण ९ सामन्यांपैकी ५ आरसीबीने तर ४ सामने जीटीने जिंकले आहे, जीटीला ही चांगली संधी आहे आरसीबीशी बरोबरी करण्याची त्यामुळे हा सामना चुरशीचा होईल अशी क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा आहे.

आरसीबीने आपली ताकद दाखवली.

फायनलपूर्वी खेळल्या गेलेल्या पहिल्या क्वालिफायरमध्ये आरसीबीने गुजरात टायटन्सचा एकतर्फी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बंगळूरने २० षटकांत पाच गडी गमावून २५४ धावा केल्या. आरसीबीकडून कर्णधार रजत पाटीदारने ३३ चेंडूंमध्ये ९३ धावांची स्फोटक खेळी केली. विराट कोहलीने २५ चेंडूंमध्ये ४३ धावा आणि कृणाल पांड्याने ४३ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ १६२ धावांवर सर्वबाद झाला. राहुल तेवतियाने संघासाठी सर्वाधिक ६८ धावा केल्या. त्यामुळे, फायनलमध्ये त्या पराभवाचा बदला घेण्याची गुजरातला सुवर्णसंधी मिळेल.

घरच्या मैदानाचा गुजरातला फायदा

गुजरात टायटन्स संघ अंतिम सामना त्यांच्या घरच्या मैदानावर, नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळणार आहे, जे संघासाठी फायदेशीर ठरू शकते. कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली, संघाने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सला हरवून अंतिम फेरीत स्थान मिळवले. त्या सामन्यात, शुभमन गिलने ५३ चेंडूंमध्ये शानदार १०४ धावा केल्या, तर साई सुदर्शनने ३२ चेंडूंमध्ये वेगवान ५८ धावा केल्या. दोन्ही फलंदाजांचा फॉर्म गुजरातसाठी एक मोठी ताकद ठरू शकतो.

आरसीबीसाठी पुन्हा संधी

दरम्यान अंतिम सामन्यात आरसीबीला मोठी संधी चालून आली आहे, टीमसोबत विराट कोहली सारखा फलंदाज असल्याने आरसीबीसाठी ही जमेची बाजू आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. विराट कोहली, रजत पाटीदार आणि कृणाल पांड्या फलंदाजीत सातत्याने योगदान देत आहेत. जेकब डफी आणि भुवनेश्वर कुमार यांनी गोलंदाजी विभागात छाप पाडली आहे. पहिल्या क्वालिफायरमध्ये, डफीने तीन बळी घेतले, तर भुवनेश्वरने दोन बळी घेतले. तसेच रसिक सलाम आणि कृणाल पांड्या यांनीही गोलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावली.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment