Crude Oil Prise down: इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील युद्धविराम करारानंतर तेलाच्या किमती घसरल्या आहे, कारण इराणसोबत अमेरिका-इस्रायलची युद्ध संपवण्याच्या दिशेने एका व्यापक कराराची आशा वाढली होती, ज्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडली जाऊ शकते. इस्रायल कडून लेबॅनॉनवर सातत्याने हल्ले सुरू असल्याने इराणने याकडे लक्ष वेधले आहे. अमेरिका आणि इस्रायल आणि इराण यांच्यातील युध्दविरामाच्या चर्चेत लेबॅनॉनचाच देखील समावेश होता, इस्रायलने लेबनॉन वरील हल्ले थांबविण्याची मागणी लावून धरली होती, आता दोघात युद्धविराम झाल्याने होर्मूझ चा तिढा सुटेल अशी राजकीय विश्लेषकांना वाटते, त्यामुळे कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे.
दरम्यान (१०:२२ GMT) भारतीय वेळनुसार आज ३:५२ पीएम वाजता, ब्रेंट फ्युचर्स १.१४ डॉलरने, म्हणजेच १.२ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ९६.६७ डॉलरवर आले होते, तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड ९० सेंट्सने, म्हणजेच ०.९ टक्क्यांनी घसरून ९५.१२ डॉलरवर आले होते.

बुधवारी, मध्य पूर्वेतील पुन्हा वाढलेल्या संघर्षानंतर, ज्यात इराणने कुवेतवर केलेले हल्ले आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अमेरिकेने केलेले लष्करी हल्ले यांचा समावेश होता, या दोन्हीमुळे सुमारे दोन टक्क्यांनी वाढ झाली होती.
पीव्हीएमचे तेल विश्लेषक जॉन इव्हान्स म्हणाले, “इराण लेबनॉन विरुद्ध इस्रायलने घेतलेली आक्रमक भूमिका थांबवण्याचा आग्रह धरत आहे, म्हणजेच हिजबुल्लाहच्या विरोधात कारवाईचा समावेश असून यामुळे खरोखरच एक तोडगा निघताना दिसत आहे.” असे ते म्हणाले.










