होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Jalgaon Crime: जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी; एका कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल

On: May 29, 2026 12:07 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon Crime News: शहरातील अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या जळगाव जिल्हा कारागृहाच्या बराक क्रमांक 8 मध्ये अचानक एका बंदिस्त बराकीतच जुन्या वादातून दोन कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावेळी एका कैद्याला भिंतीवर ढकलून दिल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. हल्‍ला करणार्‍या कैद्याविरुद्ध जळगावच्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी कारागृहातील अंतर्गत सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जिल्हा कारागृहाच्या बराक क्रमांक 8 मधील जुन्या वादातून ही हिंसक घटना घडली. 29 वर्षीय पीडित कैदी (रा. वाल्मीक नगर, जळगाव) हा आपल्या बराकीत असताना, तिथेच बंदिस्त असलेला आरोपी कैदी श्याम तुकाराम सूर्यवंशी याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून अचानक त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद काही वेळातच एवढा विकोपाला गेला की, आरोपी श्याम सूर्यवंशी याने पीडित कैद्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीदरम्यान आरोपीने पीडित कैद्याला जोरदार धक्काबुक्की करत थेट बराकीच्या भिंतीवर ढकलून दिले. कडक भिंतीवर डोके आदळल्याने पीडित कैदी रक्ताभंबाळ होऊन त्याला गंभीर दुखापत झाली.

या प्रकरणानंतर कारागृहातील सुरक्षा रक्षकांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या हल्ल्यानंतर आरोपीने पीडित कैद्याला अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली. कारागृहात घडलेल्या या गंभीर प्रकारानंतर, पीडित कैद्याच्या तक्रारीवरून जळगावच्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आरोपी कैदी श्याम तुकाराम सूर्यवंशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment