होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

पश्चिम आशियात तणाव वाढला; अमेरिकेने केशम, गोरुकवर केला बॉम्बहल्ला!

On: June 1, 2026 3:31 PM
Follow Us:
---Advertisement---

America Iran War: अमेरिकेच्या लष्कराने आठवड्याच्या अखेरीस गोरुक शहर आणि केशम बेटावरील इराणच्या रडार आणि ड्रोन तळांवर हल्ला केल्याचे म्हटले आहे. कुवेतने क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला होत असल्याचे सांगितले आहे. तर इराणच्या आयआरजीसीने (IRGC) आपल्या सिरिक बेटावरील हल्ल्यासाठी वापरल्या गेलेल्या तळावर प्रत्युत्तरादाखल हल्ला केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा तणाव वाढला आहे.

इस्रायलच्या लेबनॉनवरील वाढत्या आक्रमणाचा जगभरातून निषेध होत असून, फ्रान्सने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तातडीच्या बैठकीची मागणी केली आहे.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत करार करण्याच्या जवळ असल्याचे म्हटले आहे, तर अमेरिकन माध्यमांनी ते अधिक कठोर अटींसाठी आग्रह धरत असल्याचे वृत्त दिले आहे.

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले आहे की, अमेरिकेसोबत संदेशांची देवाणघेवाण सुरू आहे, परंतु जोपर्यंत करार अंतिम होत नाही तोपर्यंत काहीही निश्चित नाही. पण अमेरिकी लष्कराने इराणवर हल्ला केल्याने इराणने ही प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.

इराणचे उप-परराष्ट्र मंत्री काझम घरीबाबदी म्हटले आहे की, होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये “सार्वभौमत्व गाजवण्याचा” अधिकार असलेले इराण आणि ओमान हेच ​​केवळ दोन देश आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

लाठीचार्जनंतर: सोनम वांगचुक आपले उपोषण सुरूच ठेवणार; आंदोलनाचा आज निर्णायक दिवस, जंतर-मंतरवर सुरक्षेत वाढ

सीजेपी आंदोलनाने सरकार नरमले, मंत्री जे पी नड्डा नेतृत्वाशी चर्चा करणार; ‘या’ आहेत सीजेपीच्या मागणी

सीजेपीचा दावा, अभिजित दीपके पोलिसांच्या ताब्यात;..तर पोलीस म्हणाले, दिपके ताब्यात नाही! दीपकेंनी उपोषण सोडले

आंदोलक संसद भवनावर धडकले: वांगचुक म्हणाले, मला संसदेतील मोर्चात सहभागी व्हायचंय; सौरभ दास आणि आशुतोष यांची जेपी नड्डा यांच्याशी भेट

दिल्लीला छावणीचे स्वरूप: जंतरमंतरवर आदोलकांची गर्दी; पोलिसांनी लाठीचार्ज करून पांगवले

सोनम वांगचुक यांचा हस्त लिखित संदेश, काय म्हणाले वांगचुक आणि त्यांची प्रकृती कशी ‘ते’ जाणून घ्या

Leave a Comment