होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिलासा: भारताच्या दिशेने क्रूड ऑइल घेऊन निघाले ‘हे’ जहाज

On: May 30, 2026 2:45 PM
Follow Us:
---Advertisement---

Delhi News: भारतात इंधन टंचाई जाणवत असून इंधनाचे दर वाढले आहे. भारतासाठी महत्त्वाची दिलासा देणारी बातमी समोर येत आहे, भारताच्या दिशेने क्रूड ऑइल घेऊन ‘निसोस केरोस’ हे जहाज येत आहे. ते मार्शल आयलंडचा ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज (क्रूड ऑइल टँकर), असून एचपीसीएलच्या करारांतर्गत भारतासाठी अंदाजे 2,70,000 मेट्रिक टन कच्च्या तेलाचा माल घेऊन येत आहे. या जहाजावर 25 परदेशी क्रू सदस्य असून एकही भारतीय खलाशी नाही. या जहाजाने 25 व 26 मे 2026 रोजी होर्मूझ सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केली असून ते 3 जून 2026 रोजी विशाखापट्टणम येथे पोहोचण्याची शक्यता आहे, असे पेट्रिलियम मंत्रालयाने व्यक्त केली आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाढत्या तणावामुळे, 1 एलपीजी वाहक आणि 5 कच्चे तेल वाहून नेणाऱ्या जहाजांसह 13 भारतीय जहाजे अडकून पडली आहेत. या जहाजांच्या सुरक्षित परतीची खात्री करण्यासाठी नौवहन मंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. दरम्यान युद्धग्रस्त क्षेत्रातील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत आणि गेल्या 96 तासांत भारतीय ध्वज असलेली जहाजे किंवा भारतीय क्रू असलेली परदेशी जहाजे यांच्याशी संबंधित कोणत्याही घटना समोर आलेली नाही. डीजी शिपिंग नियंत्रण कक्षाने कार्यान्वित झाल्यापासून 10,841 फोन कॉल आणि 24,098 पेक्षा जास्त ईमेल हाताळले आहेत. गेल्या 96 तासांत खलाशी, त्यांचे कुटुंबीय आणि सागरी क्षेत्रातील संबंधितांकडून एकूण 509 फोन कॉल आणि 1,332 ईमेल प्राप्त झाले आहेत.

पेट्रोल- डिझेल विक्रीत ३० टक्के वाढ

दरम्यान 150 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत 30% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. खाजगी तेल विपणन कंपन्यांच्या विक्रीत -38 टक्के आणि सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांच्या घाऊक विक्रीत (-29 टक्के) घट झाली आहे. हा सगळा भाग आता सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांच्या किरकोळ विक्री केंद्रांकडे वळला आहे.

जीवनावश्यक वस्तू कायदा आणि त्याअंतर्गत जारी केलेल्या नियंत्रण आदेशांच्या संबंधित तरतुदींनुसार, राज्ये-केंद्रशासित प्रदेशांना विशेष पथके स्थापन करून, किरकोळ ग्राहकांसाठी असलेला पुरवठा मोठ्या प्रमाणात खरेदी करणारे आणि साठेबाज यांच्याकडून होणारे गैरप्रकार, काळाबाजार, अनधिकृत साठा आणि पेट्रोलियम उत्पादनांचा गैरवापर यांवर पर्यावरण संवर्धन कायद्याच्या संबंधित तरतुदी आणि त्याअंतर्गत जारी केलेल्या नियंत्रण आदेशांनुसार कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

सोनम वांगचुक यांचा हस्त लिखित संदेश, काय म्हणाले वांगचुक आणि त्यांची प्रकृती कशी ‘ते’ जाणून घ्या

America- Iran conflict: सैनिकांच्या मृत्यूनंतर अमेरिका चवताळला; इराणच्या केशम बेटावर बॉम्बहल्ला

Sonam Wangchuk: संसद परिसरात बंदोबस्त वाढवला; २० जुलैच्या मोर्चाबाबत पोलीसाचा हाय अलर्ट; सोनम वांगचुक डॉक्तरांच्या देखरेखीखाली

CJP Protest: सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेले; अभिजीत दीपके यांनी उपोषणाची घोषणा केली, दिल्ली पोलिसांवर मारहाणीचा आरोप

Wangchuk Hunger Strike: सोनम वांगचुक यांचे उपोषण २० व्या दिवशीही सुरू; तब्येत खालावली, आंदोलनस्थळी महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटी!

युद्ध भडकले: अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला; तेहरानचा पलटवार, आखाती देशांना केले लक्ष

Leave a Comment