होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

महागाई विरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे ‘दे धक्का’ आंदोलन

On: May 31, 2026 5:28 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली असून वाढती महागाई, पेट्रोल डिझेलचे गगनाला भिडलेले दर,नीट परीक्षेच्या माध्यमातुन होणारा प्रचंड भ्रष्टाचार व सर्व सामान्य विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याची निती, या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीतर्फे रॅली काढण्यात येऊन पेट्रोल-डिझेल टंचाई आणि महागाई निषेध व्यक्त करत रिक्षाला ‘दे धक्का’ आंदोलन करण्यात आले. दरम्यान जिल्हाधिकारी जळगाव यांचे प्रतिनिधी निवडणुक शाखा उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांना देण्यात आले. संगिता देहडे,रोशनी निकम,संध्या कोचुरे,मनिषा साबणे,शोभा पवार,मधुकर अहिरे,सुकलाल पेंढारकर यांनी निवेदन दिले.

राज्य व केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्व सामान्य जनता भरडली जात आहे…ईव्हीएमद्वारे मतांची चोरी करणाऱ्या या सरकारने २० ते ३० टक्के फास्ट चालणारे व चीपयुक्त “स्मार्ट मीटर” आणून सरकारने जनतेच्या खिशावर डल्ला मारुन उद्योगपतींचे खिसे भरण्याचा प्रयत्न चालवला आहे. स्मार्ट मिटरमुळे अनेक तरुणांना नोकरीवरुन काढण्यात आले. त्यामुळे युवकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.असा आरोप बहुजन मुक्ती पार्टीने केला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा.

घरगुती गॅस ४०० रुपयात उपलब्ध करुन द्या!,पेट्रोल व डिझेलवरीर GST कमी करा, पेट्रोल डिझेल,गॅसचा काळाबाजार थांबवा,जनतेला लुटणारे स्मार्ट मीटर त्वरित हटवा, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणे थांबवा या मुद्द्यांवर व सर्व सामान्य जनतेला वेठीस धरणा-या केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी संपुर्ण भारतात प्रत्येक जिल्ह्यात तीन चरणांचे आंदोलन घोषित केले.

आज संपुर्ण भारतातील प्रत्येक जिल्ह्यात तिसऱ्या चरणातील ” दे धक्का आंदोलन” करण्यात येत आहे. जळगावातही धक्का मारो आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात शेकडो स्त्री पुरुष सहभागी झाले.

‘दे धक्का’ आंदोलन

धक्का मारो आंदोलनाची सुरुवात “स्वातंत्र्य चौक,गांधी उद्यान” येथुन करण्यात आली.यात शेकडो स्त्री पुरुष आपल्या आपल्या वाहनांनी भर उन्हात या आंदोलनात केंद्र सरकारच्या विरोधात सामिल झाले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा युवा अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टीचे सुनिल देहडे, राज्य कोषाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टीविनोद अडकमोल, जिल्हा अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टीचे राजेंद्र खरे यांनी केले.

आदोलनात राजकीय, सामाजिक संघटनांचा सहभाग

राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे राजेंद्र माळी,सुभाष नावडे,डॉ.सुभाष राणे,बहुजन क्रांती मोर्चाचे सुमित्र अहिरे,कुंदन तायडे, रविंद्र मोरे,दिलीप जाधव,सावरकर रिक्षा युनियनचे दिलीप सपकाळे, अशोक सपकाळे, सोनवणे, जाधव, ठाकुर,भारत मुक्ती मोर्चाचे देवानंद निकम, राहुल सोनवणे, ज्ञानदेव भालेराव, भीमराव नन्नवरे, रमेश थाटे, लंकापती भालेराव, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे डॉ.शाकीर शेख, अकिल कासार, राष्ट्रीय पेन्शनर संघाचे आर.बी.परदेशी, देविदास पारधे, संजीव सोनवणे, अशोक बाविस्कर, त्र्यंबक सोनवणे, राष्ट्रीय किसान मोर्चाचे जगदीश सपकाळे, सिध्दार्थ सोनवणे, योगेश सोनवणे, नारायण सोनवणे, विलास सोनवणे, बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे चंद्रशेखर अहिरराव, अशोक तिडके, सुनिल सोनवणे, प्रभाकर मोरे, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे भावडु मोरे, अजय सुर्यवंशी, लहुजी क्रांती मोर्चाचे भगवान शिंदे,प्रकाश बाविस्कर, राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चाचे नंदलाल आगारे, अविनाश वानखेडे, इंडियन लॉयर असोशिएशनचे ऍड.आनंद कोचुरे आदि संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले.

या मोर्चात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले…त्यांनी राज्य सरकार व केंद्रसरकारच्या विरोधात घोषणा देत जळगाव शहर दणाणुन सोडले. धक्का मारो आंदोलनाची सांगता जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन झाली.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment