होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

NEET Exam Paper Leak: नीट परीक्षेची जबाबदारी इंडियन आर्मीवर? केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

On: May 28, 2026 2:41 PM
Follow Us:
---Advertisement---

NEET Exam Paper Leak: देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. भविष्यात असा कोणताही दगाफटका होऊ नये आणि आणि परीक्षेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतल्याचे समजते. या निर्णयानुसार, सरकारने आता थेट भारतीय लष्कराची मदत घेण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.

नीट सारख्या महत्त्वाच्या परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका फुटू नयेत यासाठी लष्कराकडे गुप्तता आणि सुरक्षेची जबाबदारी सोपवण्याबाबत सरकारकडून गंभीर विचार सुरू आहे. या संदर्भात दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अन्य महत्त्वाच्या मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय बैठक सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

केंद्रीय अन्वेषण ब्यूरो म्हणजेच सीबीआय (CBI) या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचण्यासाठी राज्यभरात मोठ्या कारवायांचे सत्र राबवत आहे. या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने आणखी दोघांना अटक (Arrest) केली असून, एकूण अटक आरोपींची संख्या आता 13 वर पोहोचली आहे.

सीबीआयने लातूरमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांना अटक केली आहे. त्यांच्यावर रसायनशास्त्र विषयाचे लीक झालेले प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचा गंभीर आरोप आहे. तर दुसरीकडे, पुण्यातील ‘APMA’ कोचिंग इन्स्टिट्यूटमधील भौतिकशास्त्राचे शिक्षक तेजस हर्षदकुमार शाह या विद्यार्थ्यालाही अटक करण्यात आली आहे. तेजस शाह याने मनिषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचे लीक झालेले प्रश्न मिळवले होते.

नीट पेपरफुटीचे हे जाळे नष्ट करण्यासाठी सीबीआयने आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर यांसह देशभरातील तब्बल 49 ठिकाणी छापे टाकले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment