होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

कानळदा येथे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ट्रॅक्टर-ट्रॉलीसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त

On: May 29, 2026 8:03 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीविरोधातील मोहिमेत जळगाव तालुका पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पथकाने कानळदा गावालगत अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले. या कारवाईत पोलिसांनी ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाळूसह सुमारे 4 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पथकाने ही कारवाई शुक्रवार, 29 मे रोजी पहाटे 1.30 वाजेच्या सुमारास कानळदा गावालगत असलेल्या महर्षी कन्व आश्रमाजवळील कच्च्या रस्त्यावर केली. पोलिसांनी आरोपीकडून सुमारे 3 हजार रुपये किंमतीची एक ब्रास अवैध वाळू जप्त केली. तसेच 4 लाख रुपये किंमतीचे स्वराज 744 एफई कंपनीचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर (क्रमांक एमएच 19 सीझेड 6707) आणि विना क्रमांकाची निळ्या रंगाची ट्रॉली असा एकूण 4 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल तुषार शाम जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयेश पांडुरंग ठाकरे (वय 24, रा. कानळदा, ता. जि. जळगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनापरवाना वाहतूक उघड

तपासादरम्यान आरोपीकडे वाळू वाहतुकीसाठी कोणताही शासकीय परवाना नसल्याचे समोर आले. अवैध गौण खनिज वाळूची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचा आरोप पोलिसांनी फिर्यादीत नमूद केला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका प्रविण संतोष पाटील पुढील तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment