होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

---Advertisement---

शेतकऱ्यांचे भल करता येत नसेल तर, नुकसान तरी करू नका! माजी आ. अनिल गोटेंचा सल्ला

On: March 20, 2026 2:56 PM
Follow Us:
---Advertisement---

Dhule News: मनमाड-इंदूर रेल्वे मार्गावरील शेतकऱ्यांचे दुर्दैव असून खासदार, आमदारांना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्याच कळालेल्या नाहीत. पुढाऱ्यांनी अकलेचे तारे तोडू नये, हा प्रश्न नीट समजून घ्या ! तुमच्याकडून शेतकऱ्यांचे भले होत नसेल तर, नुकसान तरी करू नका, असा सल्ला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मेळाव्यात शिवसेना नेते, माजी आमदार अनिल गोटे यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या नेमक्या कुठल्या मागण्या मिळाल्याशिवाय हा मार्ग होणार नाही, याचे विश्लेषण भाषणात कुठेही केलेले नाही. त्यांच्या भाषणाची सरकारने दखल सुद्धा घेतली नाही. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून रेल्वे मार्ग जाणार आहे. त्या शेतकऱ्याला राष्ट्रीय महामार्गाच्या भुसंपादनात ज्या प्रमाणे नुकसान भरपाईप्रमाणे दिली. त्या प्रमाणे नुकसान भरपाई दिल्याशिवाय, त्यांचा प्रश्न सुटणार नाही. त्यांच्या घरामध्ये एक रोजगार मिळणे आवश्यक आहे. तसेच तत्कालीन प्रधानमंत्री स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या

मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाच्या निर्मितीचे काम वेगाने सुरू आहे. पण, शेतकऱ्यांना मिळणारा जमिनीचा मोबदला हा अत्यल्प असून, जोवर तुम्ही राष्ट्रीय महामार्गाला देतात, त्याच दराने रेल्वे मार्गाच्या जमि नींना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. रेडी रेकनरच्या चारपट किंवा सहापट दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. काल परवाच खासदारांनी लोकसभेत, मनमाड इंदूर रेल्वे मार्गाचा प्रश्न अत्यंत अपुऱ्या ज्ञानावर उपस्थित केला, असा आरोप माजी आ. गोटे यांनी केला. पण मूळ प्रश्नांचा अभ्यास न करता आणि शेतकऱ्यांशी चर्चा न करता, केलेले भाषण हे अतिशय हास्यास्पद आहे. घरात एक रोजगार देण्याचे मान्य केले होते.

जे शेतकरी भुमिहिन होत आहेत, त्या शेतकऱ्यांना, त्यांचे जेवढे क्षेत्र रेल्वे मार्गाखाली जाणार आहे. तेवढी जमिन मिळालीच पाहिजे अशी मागणी आहे. वनझाडे व फळझाडे यांचे दर मनमाड पासून इंदूर पर्यंत एकच असले पाहिजे. काही ठिकाणी भुसंपादन अधिकाऱ्यांनी प्रचंड भ्रष्टाचार करुन किंवा आमदार, खासदार, पुढाऱ्यांच्या नातेवाईकांना एका आंब्याच्या झाडाला ४६ हजार रुपये प्रतिझाड तर, अन्य ठिकाणी ४०० रुपये दर दिला आहे.

ही तफावत दूर करुन सर्व शेतकऱ्यांना एकच न्याय दिला पाहिजे. यासाठी शेतकरी स्वतः ची कैफियत वेळ मिळाल्यास पंतप्रधान, रेल्वे मंत्री, राहुल गांधी इत्यादी वरीष्ठ व अन्य नेत्यांकडे दिल्लीला जावून मांडणार आहे. बैठकीत अनिल पाटील सोनगीर, प्रशांत भदाणे नगांव, सेना नेते शानाभाऊ सोनवणे, देवाजी देवरे, आंदोलनाचे नेते शेखर पगार इत्यार्दीनी मते मांडली.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment