Latest Weather News: राज्यातील तापमान घसरले आहे. मात्र काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झाला असला तरी वातावरणात गरम झळा जाणवत आहे. दिवसभर ऊन पावसाचा खेळ सुरू असतो, परंतु वातावरणात प्रचंड उकाडा ही जाणवत आहे, जळगावमध्ये ही तापमान आता ४०.८ अंश सेल्सियसवर इतके घटले आहे, मात्र दिवसभर हवामानात उष्मा होता, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा अंदाज असला तरी वाढलेल्या असह्य उकाड्याने घामाघूम होण्याची वेळ आली आहे. उकाडा वाढल्याने नागरिकांना अस्वस्थ वाटत आहे. कधी एकदाचा पावसाळा सुरू होऊन दिलासा मिळतो, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहे.
राज्यातील मराठवाड्यात काही ठिकाणी, कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. कोंकण गोव्यात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे, विदर्भात ही तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ दिसून ये आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सियस)
मुंबई (कुलाबा) ३५.६,
सांताक्रूझ ३४.७,
अलिबाग ३७.९,
रत्नागिरी ३४.८ ,
डहाणू ३७.४,
पुणे ३७.८,
लोहगाव ३७.४,
अहिल्यानगर ३८.०,
जळगाव ४०.८,
कोल्हापूर ३४.४,
महाबळेश्वर २८.२,
मालेगाव ४२.२,
नाशिक ३५.५,
सांगली ३६.२,
सातारा ३६.८,
सोलापूर ३८.०,
धाराशिव ३८.६,
छत्रपती संभाजीनगर ३९.८,
परभणी ३९.९,
बीड ३९.९,
अकोला ४२.९,
अमरावती ४१.२,
बुलढाणा ३९.७,
ब्रह्मपुरी ४४.२,
चंद्रपूर ४१.०,
गोंदिया ४१.२,
नागपूर ४२.६,
वाशीम३९.२,
वर्धा ४२.५,
यवतमाळ ४१.६.









