होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

भेटी लागी जिवा: पंढरपूर पायी दिंडीचे संयोजक जगन्नाथ बाविस्कर यांचे आडगावात स्वागत

On: June 9, 2026 4:01 PM
Follow Us:
---Advertisement---

Chopda News: चोपडा ते पंढरपूर पायी दिंडीचे संयोजक व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ बाविस्कर (गोरगावलेकर) यांचे आडगावात मान्यवरांच्या शुभहस्ते यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आला. २६ जुन रोजी दिंडी प्रस्थानाच्या पुर्व संध्येला आडगाव येथील प्रगत शेतकरी अंबादास पाटील यांचेकडून भोजन व्यवस्था तसेच उपस्थित ग्रामस्थं व भाविकभक्तांनी देणगी स्वरुपात मदत हात दिला. तर प्रास्ताविक कवी रमेश पाटील यांनी केले.

दिंडीचे प्रस्थान २७ जून रोजी स.८ वा. चोपडा येथील श्री विठ्ठल मंदिरापासून होणार असून १९ जुलै रोजी दिंडी पंढरपूरात पोहोचणार आहे. २६ जुलै पर्यंत दिंडीचा मुक्काम पंढरपुरातील विस्थापित नगर वडार भवन भक्ती मार्ग याठिकाणी राहणार आहे. तेथे ग्रामगीता कथा, श्री देवी भागवत कथा, श्रीमद् भागवत महापुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिंडीत शेकडों वारकरी सहभागी होणार आहेत. त्याबाबतचे नियोजन झालेले असुन गावागावांत बैठका घेऊन दिंडीचा प्रचार व प्रसार सुरू आहे. जास्तीत जास्त वारकऱ्यांनी ह्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन दिंडी संचालक व ग.स.संस्थेचे शाखाधिकारी जगन्नाथ बाविस्कर यांनी केले आहे.

याप्रसंगी आदर्श आडगावचे माजी सरपंच रावसाहेब पाटील, दामोदर पाटील, दिलीप श्रीराम उर्फ उखा महाराज, प्रगत शेतकरी अंबादास पाटील, शेतकी संघाचे संचालक शामकांत पाटील, डॉ. विजय पाटील, ग्रा.पं. सदस्य गणपत पाटील, नवल पाटील माजी सरपंच विजय उर्फ ताराचंद पाटील, रघुनाथ पाटील, गोकुळ माळी, भादू पाटील, भोमा पाटील, संभाजी पाटील ,गुड्डू नाना, राजेंद्र पाटील ,जीवन पाटील यांचेसह भजनी मंडळाचे सदस्य व ग्रामस्थं मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन कवी रमेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन माजी सरपंच रावसाहेब पाटील यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment