Indain Team declear For T-20 Series: भारतीय टी-२० संघाला नवा कर्णधार मिळाला आहे, सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून आणि टी-२० संघातून डच्चू देण्यात आला आहे, तर श्रेयस अय्यर भारताचा टी-२० प्रकारातील नवा कर्णधार बनला आहे. दरम्यान, १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीलाही पहिल्यांदाच वरिष्ठ संघात स्थान मिळाले आहे. तर उपकप्तान म्हणून तिलक वर्मा यांची वर्णी लागली आहे, सातत्याने धाव करण्याचे फळ त्याला मिळाले आहे. (Indain Team declear For T-20 Series) (Shreyas Iyer)
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीने शनिवारी आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ पुरुष निवड समितीने आयर्लंड आणि इंग्लंड दोन्ही मालिकांसाठी संघ जाहीर करण्यासाठी मुंबईत बैठक घेतली. विशेष म्हणजे, श्रेयस अय्यरची टी-२० संघाच्या नव्या कर्णधारपदी, तर टिळक वर्माची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सूर्यकुमार यादवला संघातून वगळले
भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या सूर्यकुमार यादवला संघातून वगळण्यात आले आहे. सूर्यकुमार यादवने केवळ कर्णधारपदच गमावले नाही, तसेच संघातील आपले स्थानही त्याने गमवाल आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकात सूर्यकुमार यादवने अमेरिकेविरुद्ध ८४ धावांची शानदार नाबाद खेळी केली होती, या स्पर्धेतील ते त्याचे एकमेव अर्धशतक होते. त्याने संपूर्ण स्पर्धेत ९ सामन्यांमध्ये ३०.२५ च्या सरासरीने २४२ धावा केल्या. त्याचा हरवलेला फॉर्मने त्याला या दोन्ही देशांच्या दौऱ्यासाठी त्याची निवड होऊ शकली नाही. (Indain Team declear For T-20 Series)

दोन विकेटकिपर संघात
श्रेयस अय्यरकडे संघाची सूत्रे सोपवण्यात आली असून, तिलक वर्मा नवा उपकर्णधार बनला आहे. तिलक गेल्या काही काळापासून टी-२० संघात नियमितपणे खेळत असून, आता तो श्रेयससोबत नेतृत्वाची भूमिका बजावताना दिसेल. ईशान किशन आणि संजू सॅमसन या दोघांची यष्टीरक्षक म्हणून निवड झाली आहे. ऑल राऊंडर अक्षर पटेलसह अर्शदीप, मोहम्मद सिराज आणि हर्षित राणा हे वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील. (Indain Team declear For T-20 Series)
वैभव सूर्यवंशी वरिष्ठ संघात प्रवेश
अनेक दिग्गज खेळाडूंनी वैभव सूर्यवंशीची आयपीएल मधील कामगिरी बघून त्याला वरिष्ठ संघात घ्यावे असे सांगितले होते. आता १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला पहिल्यांदाच वरिष्ठ संघात संधी देण्यात आली आहे. वैभवने आयपीएल २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आणि स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. यासह, वरिष्ठ पुरुष संघात स्थान मिळवणारा सर्वात तरुण खेळाडू बनून वैभवने इतिहास रचला आहे. (Indain Team declear For T-20 Series)
निवड झालेला भारतीय संघ असा
आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ असा आहे, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), वैभव सूर्यवंशी, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षरे, वर्णीष पटेल, वर्णीश कुमारी, वर्णीश, वर्णीष, रविंद्रन. मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव. (Indain Team declear For T-20 Series)











