Latest Weather News: राज्यात तापमानाचा पारा उतरला आहे, ४५ अंश सेल्सियस तापमान असलेले ब्रम्हपुरीचे तापमान देखील आता ४२.९ अंशावर घसरले आहे. राज्यातील तापमान घसरलेले असले तरी वातावरणात उकाडा कायम आहे, जळगाव मध्ये तापमान ४१.२ अंशावर आहे, दुपारी ढगाळ हवामान आहोत मात्र उकाड्याने आज देखील नागरिक बेजार झाले आहे. घामाच्या धारा थांबण्याचे नाव घेत नव्हत्या. ढगाळ हवामान आणि जळगाव मध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाल्याने उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला.
गेल्या २४ तासात मराठवाड्यात काही ठिकाणी, कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली; मराठवाड्यात काही ठिकाणी व विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

नैऋत्य मोसमी पाऊस पश्चिम-मध्य आणि पूर्व -मध्य अरबी समुद्रातील आणखी काही भागांमध्ये दाखल झाला आहे, संपूर्ण कर्नाटक व गोवा राज्यांमध्ये, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील काही भागांमध्ये आगमन झाले आहे, तामिळनाडूच्या बहुतांश भागांमध्ये तसेच नैऋत्य बंगालच्या उपसागरात, पश्चिम-मध्य व ईशान्य बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागांमध्ये, तसेच संपूर्ण पूर्व -मध्य बंगालच्या उपसागरात, वायव्य बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्ये तसेच मिझोरम आणि मणिपूर राज्यांमध्ये दाखल झाला आहे.
गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सियसमध्ये)
मुंबई (कुलाबा) ३५.०,
सांताक्रूझ ३५.०,
अलिबाग ३८.९,
रत्नगिरी ३५.५ ,
पणजी (गोवा) ३१.६,
डहाणू ३७.६,
पुणे ३७.६,
लोहगाव ३६.४,
अहिल्यानगर ३७.९,
जळगाव ४१.२,
कोल्हापूर ३४.६,
महाबळेश्वर २७.१,
मालेगाव ४२.२,
नाशिक ३६.३,
सांगली ३६.४,
सातारा ३७.२,
सोलापूर ३८.२,
धाराशिव ३७.६,
छत्रपती संभाजीनगर ३९.५,
परभणी ३९.७,
अकोला ४२.०,
अमरावती ४०.६,
बुलढाणा ३९.०,
ब्रह्मपुरी ४२.९,
चंद्रपूर ४०.४,
गोंदिया ४०.४,
नागपूर ४१.६,
वाशीम ३९.४,
वर्धा ४२.०,
यवतमाळ ३९.८.









