Cocoroch Janta Party: सीजेपीने सांगितले की, दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर शांततापूर्ण आंदोलनाला परवानगी दिली आहे. नीट, सीबीएसई, सीयूईटी आणि एसएससी यांसारख्या परीक्षांमधील कथित अनियमितता आणि भरतीमधील अनियमिततेच्या विरोधात हे आंदोलन केले जात आहे. सीजेपीने समर्थकांना थेट जंतर मंतरवर पोहोचण्याचे आवाहन केले आहे. हातात तिरंगा आणि पुस्तके घेऊ येण्यास सांगितले आहे. या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. सकाळी १० वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. प्रवक्ते सौरभ दास यांच्यासह सदस्य मोठ्या संख्यने सहभागी झाले आहे. जंतर-मंतर कडे जाणाऱ्या रस्त्यावर दिल्ली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता, दीपक यांनी शांततापूर्वक आणि शिस्तीने आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.
सोनम वांगचुक आंदोलनात सहभागी
हवामान कार्यकर्ते, अभियंता आणि शिक्षण सुधारक सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हेदेखील या आंदोलनात सामील झाले आहेत. यावेळी युवकांना मार्गदर्शन करतांना कॉकरोच जनता पार्टीला पाठींबा दिला. तसेच टीएमसी खा. सागरिका घोष यांनी ही पाठींबा दिला आहे.
दीपके दिल्लीत दाखल झाले, पुस्तके आणि तिरंगा सोबत आणा
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपक जंतर मंतर येथील निदर्शनात सहभागी होण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. दाखल झाल्यावर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक हातात घेतलेले होते,यावेळी समर्थकांना अभिवादन केले. दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर लोकांना शांततेने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. अभिजीत म्हणाले की, निदर्शनात सहभागी होणाऱ्यांनी आपल्यासोबत एक पुस्तक आणि तिरंगा आणला पाहिजे. त्यांनी पोलिसांना फुले देण्याचे आवाहनही केले, कारण फुले हे आदर आणि संवेदनशीलतेचे प्रतीक आहे. अभिजीत म्हणाले की, हे आंदोलन प्रेम, शांतता आणि लोकशाही दृष्टिकोनातून केले जाईल. त्यांच्या संदेशामुळे समर्थकांमध्ये निदर्शनासाठी उत्साह वाढला आहे.
जंतर मंतर आंदोलनाला परवानगी
काल पर्यंत परवानगी घेतली नसल्याचे पोलिसांनी सांगितले होते, आज पोलिसांनी अभिजित दीपक यांना परवानगी दिली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके शनिवारी दिल्लीत दाखल झाले आणि जंतर मंतरवरील आंदोलनात सामील झाले. पेपर लिकनंतर पाच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे आवाहन त्यांनी समर्थकांना केले.

पार्लमेंट स्ट्रीटवर समर्थकांची गर्दी
दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट परिसरात कडक पोलीस बंदोबस्तात मोठ्या संख्येने समर्थक जमलेले होते. आंदोलनस्थळी लोकांची गर्दी दिसून आली. सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. आंदोलनाबाबत प्रशासन पूर्णपणे सतर्क असल्याचे दिसत आहे. समर्थक शांततेने आपली उपस्थिती नोंदवताना दिसले. पोलीस पार्लमेंट स्ट्रीट आणि आजूबाजूच्या परिसरातील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
आंदोलन सकाळी १० वाजता सुरू
अभिजीत दिपके यांनी हे सकाळी भारतात दाखल झाल्यावर विमानतळावर समर्थकांची मोठी गर्दी झाली, दीपक म्हणाले की, शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सकाळी १० वाजता सुरू होईल. त्यांनी समर्थकांना आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध ठेवण्याचे आवाहन केले. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सीजेपीच्या मोहिमेबद्दल चर्चा मोठी आहे. जंतर-मंतर येथील निदर्शनात मोठ्या संख्येने लोक सहभागी होण्याची शक्यता आहे.
प्रधान यांनी ५ वाजेपर्यंत राजीनामा द्यावा
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पाच वाजेपर्यंत राजीनामा द्यावा, अन्यथा पुढच्या शनिवारी पुन्हा जंतर मंतरवर आंदोलन करण्याचा इशारा दिला.










