होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

---Advertisement---

वीज कोसळून सहा एकर गव्हाच्या पेंड्या खाक; विल्हाळा शिवारातील घटनेत लाखोंचे नुकसान

On: March 21, 2026 4:17 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: तालुक्यातील विल्हाळा शेती शिवारातील सहा एकर क्षेत्रातील गव्हाच्या पेंढ्यांचा ढीग वीज कोसळल्याने जळून खाक झाला आहे. त्यात लाखोचे वण झाले आहे.दि.१९ मार्च रोजी रात्री आलेल्या वादळी अवकाळी पाऊस विजांच्या कडकडाटात कोसळला. यावेळी वीज कोसळून विल्हाळा शेती शिवारातील दीपक सोपान वारके व नयना दीपक वारके यांच्या गट नंबर ७४६ मध्ये सहा एकर क्षेत्रात गव्हाच्या पेंढ्या गहू काढण्यासाठी गोळा करून एकत्र ढीग करून ठेवलेल्या होत्या.

मात्र अवकाळी पाऊस पडत असताना वीज कोसळून झालेल्या घटनेत संपूर्ण क्षेत्रातील गव्हाच्या पेंढ्या जळून खाक झाल्या. त्यामुळे दीपक वारके व नयना वारके यांचे सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचा गहू जळून खाक झाला. परिणामी अगदी हाता तोंडाशी आलेला रब्बी हंगामातील घास डोळ्यादेखत जळून खाक झाल्याने

संबंधित कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अगोदरच खरीप हंगाम पूर्णतः हाती आलेला नाही. त्यातही रब्बीचे असे नुकसान झाल्याने संबंधित कुटुंब हतबल झाल्याचे दिसून आले. महसूल व कृषी विभागाने लवकरात लवकर पंचनामा करून आर्थिक मदत देऊन कुटुंबाला दिलासा देण्याची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

शिंदीसह परिसरात पावसाचे थैमान पिकांचे नुकसान

भुसावळ शिंदीसह मोंढाळा, मानमोडी, विचवा परिसरात सायंकाळी ६.४५ ते ८.१५ वाजेच्या दरम्यान असा सुमारे सव्वातास जोरदार विजांच्या गडगडात पाऊस झाला. शेती शिवारातून पाणी वाहून निघाले. परिणामी शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. कापणीला आलेला गहू, हरभरा, मका या पिकाचे व गुरांसाठी साठवून ठेवलेल्या कडबा पेंढ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाल्याचे येथील युवा शेतकरी भूषण पुनमसिंग राजपूत यांनी सांगितले. पाऊस सुरू असतानाच बीज गेल्यामुळे गावातही अचानक आलेल्या या पावसामुळे

ग्रामस्थांची धावपळ झाल्याचे दिसून आले. मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाने तातडीने शेतीशिवारात पंचनामे करण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या निलिमा नेमाडे यांनी सांगितले. रात्रीची वेळ असल्याने गावासह शेती शिवारातील नुकसानीचा अंदाज येऊ शकला नाही, मात्र मोठ्याप्रमाणावर शेतीशिवारात हानी झाल्याचे सांगण्यात आले. गहू पिकाची काढणी सुरू झाली आहे. पावसाने गहू भिजला असेल तर त्याचा परिणाम भावावर होऊ शकतो, असा शेतकऱ्यांचा कयास आहे.

दरम्यान विल्हाळा शेतीशिवारात अवकाळी पाऊस पडत असताना वीज कोसळून झालेल्या घटनेत संपूर्ण क्षेत्रातील गव्हाच्या पेंढ्या जळून खाक झाल्या. त्यामुळे दीपक वारके व नयना वारके यांचे सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचा गहू जळून खाक झाला. संबंधित कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रब्बीचे असे नुकसान झाल्याने संबंधित कुटुंब हतबल झाल्याचे दिसून आले. भुसावळ – शिंदीसह मोंढाळा, मानमोडी, विचवा परिसरात सायंकाळी ६.४५ ते ८.१५ वाजेच्या दरम्यान असा सुमारे सव्वा तास जोरदार वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडात पाऊस झाला.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment