होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

---Advertisement---

भोंदू खरातने राजकीय ओळखीचा फायदा कशासाठी घेतला का? सीडीआरमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

On: April 4, 2026 12:39 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचे राजकीय कनेक्शन समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या हाती (CDR) कॉल डिटेल रेकॉर्ड लागल्याने राजकारण्याचे कनेक्शन समोर आले आहे. त्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांनीे १७ कॉल केले तर रुपाली चाकणकर यांनी १७७ वेळेस कॉल केल्याचा दावा दमानिया यांनी केल्याने खळबळ उडाली.त्यामुळे विरोधकांनी या प्रकरणी प्रश्न उपस्थित करून सरकार या प्रकरणाची गांभीर्याने दाखल घेऊन चौकशी करणार एका असा सवाल केला.

अशोक खरात प्रकरण पहिल्या दिवसापासून राजकीय कनेक्शनमुळे चर्चेत आहेत. भोंदू बाबाचे राजकारण्यांशी संपर्क समोर आल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. महिलांचे शोषण करणारा ढोंगी बाबा याने राजकारण्यांशी असलेल्या संबंधांचा फायदा उचलून कुणा सामान्य नागरिकांना त्रास दिला का? याची ही चौकशी करण्याची गरज आहे. दरम्यान अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री पदाचा व्यक्ती भोंदू बाबाशी इतका वेळ बोलतो, हे जाणून घेण्याचा अधिकार जनतेला आहे, चाकणकर याचे ही १७७ कॉल झाले, त्यांचे ३३,७२७ सेकंद संभाषण आहे. बहीण प्रतिभा चाकणकर यांचे ही २३६ कॉल झाले. पाटील, सुनील तटकरे यांची ही नावे असल्याची माहिती दमानिया यांनी दिली. या सर्वांची चौकशी करून अटक करण्याची मागणी ही दमानिया यांनी केली आहे.

दरम्यान शिंदे यांच्या कॉल संभाषण बाबत उद्योग मंत्री उद्य सामंत यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी शिंदे यांच्या अडीच वर्ष मुख्यमंत्री असतांनाच्या काळात अनेक लोक अस्वस्थ होते, कोणाची श्रद्धा असू शकते मात्र श्रध्देचा कोणी गैरफायदा घेत काही करेल हे ओळखणे कठीण आहे, असे सांगून शिंदेंचा बचाव केला. दरम्यान ठाकरे सेनेच्या नेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे २१ मिनिटांचे संभाषण आहे, ही माहिती दमानिया, माध्यमं माझ्याकडे ही आहे, ती एसआयटीकडे का नाही? असा सवाल उपस्थित करून सरकारला या प्रकरणाचे गांभीर्य नसल्याचा आरोप त्यांनी केला.

एकंदरीत आरोप प्रत्यारोपाचे सत्र सत्ताधारी आणि विरोधांमध्ये सुरू झालेले असतांनाच दमानिया यांनी सीडीआर बॉम्ब टाकल्याने संबधितांनी सावध भूमिका घेतली आहे. एसआयटी या प्रकरणी केव्हा कारवाई करणार हाच प्रश्न आता सर्वसामान्याना पडला आहे. इतकी माहिती समोर येत आहे पण त्यात ठोस अशी कारवाई होतांना दिसत नसल्यानेच विरोधकांनी सरकारला गांभीर्य नसल्याचा आरोप केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली; ‘देऊळ बंद २’ २१ मे रोजी होणार प्रदर्शित; लेखक-दिग्दर्शक प्रविण तरडे यांची माहिती

मुंबईसाठी मोठी बातमी: ‘इतक्या’ नवीन एसी लोकल मिळणार; १५ डब्याच्या फेऱ्यातही वाढ

Ladki Bahin Yojana: महिलांनो लक्ष द्या! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ; नवी तारीख जाहीर

Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत मास्टर स्ट्रोक, घेतले 6 मोठा निर्णय

शिवशाही पुनर्वसन’ प्रकल्पाला बळकटी; महाराष्ट्र झोपडपट्टीमुक्त करणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Ashok Kharat News: अशोक खरात प्रकरणी विजय वड्डेटीवार यांनी केली ‘ही’ मोठी मागणी, नेमके ते काय म्हणाले; जाणून घ्या!

Leave a Comment