होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

शेतकी संघाचा ‘भोंगळ’ कारभार; शेतकऱ्यांची टोकणसाठी पायपीट…

On: April 11, 2026 4:16 PM
Follow Us:
---Advertisement---

Bhadgaon News: भडगाव शेतकी संघाच्या भोंगळ कारभाराने प्रशासकीय नियोजन कोलमडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ज्वारी व मका खरेदीच्या टोकणसाठी शेतकऱ्यांना पहाटे ४ वाजेपासून रस्त्यावर रांगा लावाव्या लागत आहे त्यामुळे प्रशासकीय नियोजनाचा अभाव प्रकर्षाने दिसून आला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले, तर शेतकऱ्यांचा रोष पाहून चेअरमन व संचालक मंडळाने काढता पाय घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव-पाचोरा मार्गावर पहाटेपासूनच शेकडो शेतकऱ्यांनी टोकन मिळवण्यासाठी गर्दी केली होती. याठिकाणी कोणतीच सुविधा नव्हती तसेच उन्ह असल्याने सावलीची व्यवस्था नसल्याने वृद्ध शेतकरी आणि महिलांना जीव धोक्यात घालून रस्त्याच्या कडेला ताटकळत उभे राहावे लागले. तासनतास उन्हात उभे राहूनही टोकन न मिळाल्याने दुसऱ्या दिवशीही अनेक शेतकऱ्यांना रिकाम्या हाती घरी परतावे लागले. रक्ताचे पाणी करून पिकवलेला माल विकण्यासाठी आम्हाला गुन्हेगारांसारखे रस्त्यावर उभे राहावे लागतेय का? असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

चेअरमन अन् संचालकाचा पोबारा!

शेतकऱ्यांनी संताप अनावर झाला त्यामुळे शेतकऱ्यांनी जाब विचारण्यास सुरू केल्यावर याठिकाणी उपस्थित असलेले शेतकी संघाचे चेअरमन आणि संचालक मंडळ आपली जबाबदारी झटकून तिथून काढता पाय घेतल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींच्या या पळकाढू भूमिकेमुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले गेले अशी भावना झाली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाला बोलावण्यात आले.

संघाच्या विद्यमान चेअरमननी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणून ऑनलाइन किंवा शिस्तबद्ध टोकन पद्धत राबवावी. प्रशासनाने या संपूर्ण गोंधळाची दखल घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी. आम्ही पहाटे ४ वाजेपासून उपाशीपोटी रांगेत उभे आहोत. ना पिण्याच्या पाण्याची सोय आहे, ना बसण्याची. व्यवस्थापन पूर्णपणे फेल झाले असून आम्हाला वाली उरलेला नाही. प्रशासनाने तात्काळ लक्ष दिले नाही तर आम्ही उग्र आंदोलन असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला. तसेच शेतकरी संघाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असून, शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत होत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने हस्तक्षेप करावा करून खरेदी प्रक्रिया सुरळीत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment