होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

विदर्भात उष्णतेची लाट, जळगावमध्ये उकाडा घेतोय नागरिकांची परीक्षा, तुमच्या जिल्ह्याचे तापमान किती ‘ते’ जाणून घ्या

On: May 26, 2026 6:22 PM
Follow Us:
---Advertisement---

Latest Weather News: जळगावचे तापमान पुन्हा एकदा घसरले आहे. सोमवारी तापमान ४१.५ इतके होते, आज तापमानात किंचित वाढ झाली असून आज पारा ४२.५ अंश सेल्सियस इतका होता. तापमानाचा पारा कमी जास्त होत असला तरी वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत आहे, दिवसभर उष्ण झळांनी नागरिक हैराण झाले आहे, अधूनमधून ढगाळ हवामान दिलासा देत असले तरी वातावरणात उष्णता कायम आहे. दरम्यान विदर्भ तापला असून तेथील तापमान हे ४५ ते ४७ अंश सेल्सियसच्या दरम्यान आहे. त्यामुळे विदभातील नागरिकांची उष्ण वातावरणाने भाजनी होत आहे. नागपूर, चंद्रपूर आणि गोंदिया येथील तापमान ४६ अंशावर आहे.

राज्यात सार्वधिक तापमान ब्रम्हपुरीत

राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे ४७.६ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे. सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे २९.५ अंश सेल्सियस आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट झाली. विदर्भात बऱ्याच ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट होती. कोकण गोवा, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे.विदर्भात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाले आहे, कोकण गोवा व मराठवाड्यात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सियसमध्ये)

मुंबई (कुलाबा) ३५.३,
सांताक्रूझ ३५.१,
रत्नागिरी ३४.१,
पणजी (गोवा) ३३.६,
डहाणू ३६.७,
पुणे ३७.०,
लोहगाव ३६.८,
अहिल्यानगर ३९.०,
जळगाव ४२.५,
कोल्हापूर ३६.०,
महाबळेश्वर २९.५,
मालेगाव ४२.४,
नाशिक ३६.५,
सांगली ३८.२,
सातारा ३७.७,
सोलापूर ४०.३,
धाराशिव ३९.८,
छत्रपती संभाजीनगर ४१.२,
परभणी ४३.०,
अकोला ४५.४,
अमरावती ४५.०,
बुलढाणा ४१.७,
ब्रह्मपुरी ४७.६,
चंद्रपूर ४६.०,
गोंदिया ४६.१,
नागपूर ४६.५,
वाशीम ४३.५,
वर्धा ४६.०,
यवतमाळ ४४.४.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

MSRTC Student Pass : एसटीचा मोठा निर्णय ! विद्यार्थ्यांचा बस प्रवास होणार डिजिटल; आता कागदी पास ऐवजी मिळणार NCMC स्मार्ट कार्ड

सायबर आणि आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी तांत्रिकदृष्टया सक्षम होण्याची गरज: पो. महासंचालक सदानंद दाते

नाशिक ‘टीसीएस’ प्रकरणाचे मलेशिया कनेक्शन?, शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांचा गौप्यस्फोट

पुणे विषारी दारू प्रकरणाचे पडसाद: राज्यातील ९८८ मिथेनॉल परवानेधारकांची झाडाझडती; तुकाराम मुंढे यांनी काय आदेश दिले ‘ते’ जाणून घ्या

राज्यात १५ जूनपर्यंत मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी; कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले ‘हे’ आवाहन

नीट पेपरफुटीवर शरद पवारांचे मोठे विधान, या घोटाळ्याबाबत काय म्हणाले ‘ते’

Leave a Comment