होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

IND vs PAK : टीम इंडियासमोर 4 मोठी आव्हाने; पाकिस्तानविरुद्ध परवडणार नाही ‘या’ चूका

On: February 13, 2026 12:27 PM
Follow Us:
---Advertisement---

IND vs PAK : टीम इंडिया रविवार, 15 रोजी टी-20 विश्वचषकातील तिसरा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. राजकीय वाद, बॉयकॉटच्या धमक्या आणि दोन्ही देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर हा सामना अधिकच चर्चेत आला आहे. दरम्यान, या हाय-व्होल्टेज सामन्यात टीम इंडियासमोर काही आव्हाने असून, पाकिस्तानविरुद्ध ते परवडणार नसल्याचे मत टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू व्यक्त करत आहेत.

नामिबियाविरुद्ध विजय मिळवूनही टीम इंडियासमोर काही गंभीर आव्हाने उभी आहेत. सलामीवीर अभिषेक शर्मा पोटाच्या संसर्गामुळे अद्याप पूर्ण तंदुरुस्त नाही. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी तो पाकिस्तानविरुद्ध खेळेल का, याबाबत अनिश्चितता आहे. तो अनुपस्थित राहिल्यास फलंदाजीची जबाबदारी अधिक वाढेल.

मधल्या फळीतील फिनिशर रिंकू सिंगची कामगिरीही चिंतेचा विषय ठरली आहे. पहिल्या दोन सामन्यांत त्याला अपेक्षित धावा करता आल्या नाहीत. त्याची शांत बॅट संघासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

पाकिस्तानविरुद्ध अशा चूका परवडणार नाही!

याशिवाय, नामिबियाविरुद्ध मधल्या षटकांत फिरकीसमोर भारतीय फलंदाज अडखळले. कोलंबोची खेळपट्टी फिरकीस अनुकूल ठरल्यास ही कमजोरी पुन्हा उघड होऊ शकते. त्यातच पॉवरप्लेमध्ये गोलंदाजांनी जास्त धावा दिल्याने सुरुवातीचा दबाव वाढला होता. पाकिस्तानविरुद्ध अशा चुका महागात पडू शकतात. त्यामुळे भारताला या उणिवा तातडीने सुधाराव्या लागती, असे मत टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू व्यक्त करत आहेत.

(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी ‘शौर्य मराठी’च्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.) 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment