होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

मध्य महाराष्ट्रात १२-१३ जूनला मान्सूनपूर्व पावसाची शक्यता; जळगावात उकाडा कायम

On: June 12, 2026 11:00 AM
Follow Us:
---Advertisement---

Latest Weather News: राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ४४.५ अंश सेल्सियस नोंदवले गेले आहे. तर महाबळेश्वर यथे सर्वात कमी अर्थात कमाल तापमान १८.६ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे. जळगावमध्ये तापमान पुन्हा वाढले असून आज ४२.५ अंश सेल्सियस तापमान होते तापमानाचा सातत्याने ४२ अंशावर असल्याने वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत आहे. त्यामुळे दुपारी भयंकर गरम झळा सोसाव्या लागत आहे. हवामान विभागाने यापूर्वीच मान्सून १५ जूननंतर राज्यात सर्वत्र सक्रिय होईल, असा अंदाज दिला आहे.

गेल्या २४ तासांत कोकण गोव्यात काही ठिकाणी पाऊस झाला आहे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला असून कोंकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली; मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

नैर्ऋत्य मोसमी पाऊस कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील आणखी काही भागांमध्ये, तसेच ताममळनाडू, पुद्दुचेरी व बंगालच्या उपसागरातील उर्वरित भागांमध्ये, पश्चिम-मध्य व वायव्य बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागांमध्ये, तसेच पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागांमध्ये दाखल झाला आहे.

दि. ११ ते १५ जून दरम्यान हवामान खात्याचा अंदाज

११ जून: महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता.

१२ – १३ जून: कोकण-गोवा आणि विदर्भात काही ठिकाणी; तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता.

१४ – १५ जून: महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता.

११ जून: महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह (ताशी ४०-५० किमी) वादळ होण्याची शक्यता. कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्ण व दमट हवामानाची शक्यता. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट (हीट वेव्ह) येण्याची शक्यता.

१२ जून: कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह (ताशी ४०-५० किमी) वादळ होण्याची शक्यता. विदर्भात काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यांसह (ताशी ५०-६० किमी) वादळी वारे वाहण्याची शक्यता. कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्ण व दमट हवामानाची शक्यता. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट (हीट वेव्ह) येण्याची शक्यता.

१३ जून: कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह (ताशी ४०-५० किमी) वादळ होण्याची शक्यता. विदर्भात काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यांसह (ताशी ५०-६० किमी) वादळी वारे वाहण्याची शक्यता. कोकण-गोवा भागात काही ठिकाणी उष्ण व दमट हवामानाची शक्यता.

१४ जून: मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह (ताशी ४०-५० किमी) वादळ होण्याची शक्यता. विदर्भात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह (ताशी ३०-४० किमी) वादळ होण्याची शक्यता.

१५ जून: विदर्भात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह (ताशी ३०-४० किमी) वादळ होण्याची शक्यता.

(मध्य महाराष्ट्र) संध्याकाळचे तापमान अंश सेल्सियसमध्ये

Pune(पुणे) 35.9
Lohgaon(लोहगाव) 36.0
Jalgaon (जळगाव) 42.5
Kolhapur (कोल्हापुर) 34.3
Mahabaleshwar (महाबळेश्वर) 26.1
Malegaon (मालेगाव) 42.2
Nasik (नाशिक) 35.9
Sangli (सांगली ) 35.4
Satara (सातारा ) 36.5
Solapur (सोलापुर) 38.5

KONKAN – GOA (कोंकण – गोवा )

Mumbai (मुंबई) 36.0
Santacruz (सांताक्रूज) 35.3
Alibag (अलिबाग) 36.6
Ratnagiri (रत्‍नागिरी ) 34.2
Dahanu (डहाणू) 36.7

MARATHWADA (मराठवाड़ा)

Dharashiv (धाराशिव) 36.7 3.
Chhatrapati Sambhajinagar (छत्रपती संभा जी नगर) 39.9
Parbani (परभणी) 39.9
Beed (बीड) 40.4

VIDARBHA (विदर्भ)

Akola(अकोला ) 43.4

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

जिल्ह्यातील एक सत्र शाळांच्या वेळेत बदल करा: समन्वय समितीची मागणी

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाणीसाठा आणि खरीप हंगामाचा मुख्य सचिवांकडून आढावा

अवैध वाळू वाहतुकीवर प्रांत अधिकाऱ्यांची धडक कारवाई; ४६ लाखाचा मुद्देमाल ताब्यात, वाळूने भरलेले दोन डंपर जप्त

वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा, पोलिसांनी सुमारे ८ लाखांचा दंड केला वसूल!

गोदावरीच्या किनारी आढळली एक काळ्या रंगाची सुटकेस, चैन उघडल्यावर पोलीसांना ही बसला धक्का!

नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवला समाजापुढे नवा आदर्श; स्वतःच्या मुलांचा शासकीय शाळेत केला प्रवेश

Leave a Comment