Iphone Useres Update: मोबाईल वापरताय तो ही अँपल फोन मग तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपची मूळ कंपनी असलेल्या मेटाने (Meta) स्पष्ट केले आहे की, आता ३० नोव्हेंबरनंतर जुन्या आयओएस (iOS) आवृत्त्यांवर चालणाऱ्या आयफोन्सवर व्हॉट्सॲप काम करणे बंद होईल, त्यामुळे आता व्हॉट्सॲप चालू ठेवण्यासाठी कंपनी आता नवीन आणि अद्ययावत सॉफ्टवेअर आवृत्त्या अनिवार्य करत आहे.
‘मेटा’ची ही नवी उपडेट
आयफोन वापरकर्त्यांसाठी मेटाकडून महत्त्वाची उपडेट आली आहे. व्हॉट्सॲप कोणत्याही आयफोन मॉडेलसाठी सपोर्ट पूर्णपणे बंद करत नाहीये; मात्र वापरकर्त्यांना फक्त त्यांच्या फोनचे सॉफ्टवेअर अपडेट करावे लागणार आहे. व्हॉट्सॲप सध्या आयओएस १५.१ आणि त्यापुढील सर्व नवीन आयफोन आवृत्त्यांना सपोर्ट करते. तथापि, ३० नोव्हेंबरपासून आयओएस १५.१ साठीचा सपोर्ट संपेल आणि व्हॉट्सॲप चालवण्यासाठी फोनमध्ये किमान आयओएस १५.५ किंवा त्याहून अधिक (version) आवृत्ती असणे आवश्यक केले आहे. या नवीन बदलाचा परिणाम प्रामुख्याने खालील आयफोन मॉडेल्सवर होईल.

आयफोन एसई (पहिली पिढी)
आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस
जर तुम्ही यापैकी कोणतेही मॉडेल वापरत असाल आणि तुमचे सॉफ्टवेअर जुने झाले असेल, तर तुम्ही तुमचा फोन ताबडतोब iOS 15.8.3 (किंवा नवीनतम उपलब्ध आवृत्ती) वर अपडेट करावा. यानंतर, व्हॉट्सॲप तुमच्या फोनवर सुरळीतपणे चालू राहील.
आयफोन कसा अपडेट करावा?
तुमच्या आयफोनची ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट करणे खूप सोपे आहे. तुम्ही खालील पायऱ्या फॉलो करू शकता:
सेटिंग्ज उघडा: सर्वप्रथम, तुमच्या आयफोनच्या सेटिंग्जमध्ये जा.
जनरल सेक्शन: त्यानंतर, जनरल पर्यायावर क्लिक करा.
सॉफ्टवेअर अपडेट: येथे, तुम्हाला सॉफ्टवेअर अपडेटचा पर्याय दिसेल. त्यावर टॅप केल्यावर नवीनतम उपलब्ध अपडेट दिसेल. ते डाउनलोड करून इन्स्टॉल करा.
सामान्यतः जेव्हा नवीन अपडेट उपलब्ध होते, तेव्हा आयफोन आपोआप एक नोटिफिकेशन पाठवतो.
iOS 15.5 किंवा त्यापुढील आवृत्ती
नवीन फीचर्स जोडण्यासाठी आणि सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी व्हॉट्सॲप जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमना सपोर्ट देणे बंद करते, असे अनेकदा दिसून येते. पण यंदा दिलासा असा की, जुन्या आयफोन वापरकर्त्यांना व्हॉट्सॲप वापरण्यासाठी नवीन फोन विकत घेण्याची किंवा पैसे खर्च करण्याची गरज नाही. सध्या iOS 15.1 वर चालणारी उपकरणे सहजपणे iOS 15.5 किंवा त्यापुढील आवृत्तीवर अपडेट केली जाऊ शकतात. तयामुळे वारकर्त्यांना हा मोठा दिलासा आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांच्या मते, सायबर गुन्हे, हॅकिंग आणि ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी, प्रत्येकाने आपल्या स्मार्टफोनचे सॉफ्टवेअर आणि ॲप्स नेहमी नवीनतम आवृत्तीवर अपडेट ठेवावेत. यामुळे फोन सुरक्षित राहतो आणि नवीन फीचर्सचा लाभ घेणेही शक्य होते.







