Peroleum Ministry Statment: भारताकडे कच्चे तेल, एलपीजी आणि एलएनजीचा पुरेसा साठा असून, तो अंदाजे दोन महिने पुरेल इतका आहे. मंत्रालयाने ग्राहक आणि उद्योगांना इंधनाच्या उपलब्धतेबाबत आश्वासन दिले. असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने गुरुवारी मंत्रालयीन पत्रकार परिषदेला संबोधित करतांना माहिती दिली. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, प्रमुख पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा स्थिर असून, सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या देशभरात अखंड उपलब्धता सुनिश्चित करत आहेत.
अखंड पुरवठा सुरू
शर्मा म्हणाल्या, “कच्चे तेल, पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा स्थिर आहे. आमच्या रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. काही किरकोळ विक्री केंद्रांवर अजूनही अतिरिक्त विक्री होत आहे, परंतु सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या सुरळीत पुरवठा करत आहेत.” इंधनाच्या साठ्याबाबत माध्यमांशी बोलतांना शर्मा यांनी सांगितले की, सरकारकडे पुरेसा साठा असून अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. आमच्याकडे पुरेसा साठा आहे. सर्व ग्राहकांची गैरसोय न होता, सर्वाना पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि नैसर्गिक वायूचा सुरळीत पुरवठा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.” (Petrol DIsel).

१.४९ कोटी सिलेंडर वितरित
शर्मा पुढे म्हणाल्या, “आमच्याकडे सुमारे दोन महिन्यांचा रोलिंग स्टॉक उपलब्ध आहे.”, “किमतीं बाबतीत, भविष्यात काय होईल? मी त्यावर सध्या भाष्य करणे आता योग्य नाही.” पेट्रोलियम मंत्रालयाने कार्यान्वयन डेटा देखील शेअर केला, जो इंधन पुरवठ्यात सातत्यपूर्ण दर्शवतो. गेल्या तीन दिवसांत सुमारे १.४ कोटी घरगुती एलपीजी सिलिंडरची नोंदणी झाली, तर १.४९ कोटी सिलिंडर वितरित करण्यात आले. “याच कालावधीत सुमारे २२,३४० टन व्यावसायिक एलपीजीची विक्री झाली.” असल्याचे त्यांनी सांगितले. (GAS CYILENDER)
९.४२ लाख पीएनजी जोडण्या
पेट्रोलियम मंत्रालयाने ५ किलो एलपीजी सिलिंडरची विक्री सुमारे १.९१ लाख युनिट्स झाल्याचे सांगितले आहे..मार्च महिन्यापासून, सुमारे ९.४२ लाख पीएनजी जोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत, ३.१२ लाख जोडण्यांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत आणि ९.४४ लाख नवीन ग्राहकांची नोंदणी झाली आहे. सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून, स्थानिक प्रशासनाला शहर गॅस कंपन्यांसोबत काम करून, जिथे जिथे ही सुविधा उपलब्ध आहे तिथे एलपीजी ग्राहकांना पीएनजीकडे वळण्यास प्रोत्साहित करण्यास सांगितले आहे.चवा.”(PNG)











