Latest Weather News: विदर्भात कमाल तापमानात वाढ झाल्याचे दिसत आहे, राज्यात सर्वात उष्ण शहर म्हणून वर्धा समोर आले आहे. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा येथे ४४.५ अंश सेल्सियस नोंदवले गेले आहे. त्याखालोखाल ब्रम्हगिरी ४४.२, नागपूर ४४, अकोला ४३.४ अमरावती ४२.८ अंश सेल्सियस इतके तापमान वाढले आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव येथे ही तापमान ४२. ५ इतके राहिले आहे. जळगावचे तापमान ४२ अंशाच्या आसपास कायम आहे. येथील तापमान अद्यापही कमी होण्याचे चिन्हे दिसत नसून उष्मा जळगावकरांची परीक्षा बघत आहे. जूनचा अर्धा महिना गेला तरी पावसाचे चिन्हे दिसत नाहीये, १५ जून नंतर राज्यात सर्वत्र पडेल असा अंदाज असला तरी अल निनोने वातावरणांत गरमी अधिक वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे होते. विदर्भात काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली; कोंकण गोवा व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.
गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सियसमध्ये)
मुंबई (कुलाबा) ३६.०,
सांताक्रूझ ३५.३,
अलिबाग ३६.६,
रत्नागिरी ३४.२,
डहाणू ३६.७,
पुणे ३५.९,
लोहगाव ३६.०,
जळगाव ४२.५,
कोल्हापूर ३४.३,
महाबळेश्वर २६.१,
मालेगाव ४२.२,
नाशिक ३५.९,
सांगली ३५.४,
सातारा ३६.५,
सोलापूर ३८.५,
धाराशिव ३६.७,
छत्रपती संभाजीनगर ३९.९,
परभणी ३९.९,
नांदेड ४०.२,
बीड ४०.४,
अकोला ४३.४
अमरावती ४२.८
बुलढाणा ४१.६,
ब्रह्मपुरी ४४.२,
चंद्रपूर ४२.२,
गोंदिया ४१.८,
नागपूर ४४.०,
वाशीम ४२.५,
वर्धा ४४.५,
यवतमाळ ४३.२.






